Home /News /national /

आधी प्रेयसीला घरातून पळवून केले लग्न, नंतर प्रियकरानेच केला हा धक्कादायक प्रकार

आधी प्रेयसीला घरातून पळवून केले लग्न, नंतर प्रियकरानेच केला हा धक्कादायक प्रकार

तियरी गावातील सुजित यादव याने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर तो तिला तीन महिन्यांपूर्वी लखनौला घेऊन गेला.

    चंदौली, 29 जून : प्रेमात फसवणुकीच्या (Love Affiar) अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या असतील. मात्र, उत्तरप्रदेश राज्याच्या चंदौलीतील (Chandauli UP) इलिया परिसरात प्रेमात फसवणूक झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बदमाश तरुणाने तरुणीला आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर घरातून पळून जाऊन लग्न केले. यानंतर त्याच्याच पत्नीचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून टाकला. या तरुणीने विरोध केल्यावर आरोपी तरुण पतीने तिला मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा आरोप मुलीने केला आहे. या घटनेमुळे एक धक्कादायक अनुभव आलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानतंर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे नेमकी घटना -  युवतीने दिलेली तक्रार अशी की, तियरी गावातील सुजित यादव याने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर तो तिला तीन महिन्यांपूर्वी लखनौला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने या तरुणीसोबत लग्न (Marriage) केले. यानंतर गेल्या 20 मेला आरोपी सुजीत तिला आपल्या घरी तियरी येथे घेऊन आला. त्यानंतर त्याने या आपल्या पत्नीचा म्हणजे या तरुणीचा अश्लिल व्हिडिओ (Abusive video) बनवला आणि अश्लिल फोटोही काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल (Abusive video and photo viral on social media) करुन दिले. पतीने व्हिडिओ,फोटो व्हायरल केल्याचे समजताच तिने तीव्र विरोध व्यक्त केला. मात्र, पती सुजीतने तिला मारहाण केली. तसेच तिला घरातून हाकलून लावले. यानंतर ती तरुणी इलिया पोलीस ठाणे येथे पोहोचली आणि तिने घडलेल्या प्रकारासाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि तरुणाच्या विरोधात आयपीसी कलम 376 , 354 , 323 , 504 आणि 67 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा - मित्राने लग्नात बोलावलं, पण वरातीत नेलंच नाही, रुसलेल्या दोस्ताने ठोकला 50 लाखांचा दावा या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्याचे प्रमुख अमित कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यासोबत तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh news, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या