हरिद्वार, 27 जून : उत्तराखंडमधील हरिद्वार
(Haridwar) जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमंत्रण देऊन मित्र लग्नात
(Friend Marriage) गेल्यावर लग्नाच्या मिरवणुकीत न नेल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्रावर तब्बल ५० लाखांचा दावा ठोकला आहे. तुम्हाला ही बातमी वाचून आश्चर्य वाटेल. मात्र, खरंच असं घडलंय. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत
(Friend Marriage Invitation) दिलेल्या वेळेआधीच वरमुलगा वरात घेऊन चालला गेला. इतर लोक पोहोचले तोपर्यंत वरात निघून गेली होती, असा आरोप करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना -
यावेळी मुलाने आपल्या मित्रासोबत फोनवर बोलणे केले तर त्याने आपली चुक मान्य केली नाही. इतकेच नव्हे तर त्यांना परत जाण्यासही सांगितले. यानंतर याठिकाणी असलेल्या लोकांनी लग्नपत्रिका वाटणाऱ्या मित्राला शिवीगाळ केली.
मित्राच्या वागणुकीमुळे आणि लोकांच्या मानसिक छळामुळे दुखावलेल्या मित्राने आपले वकील अरुण भदौरिया यांच्यामार्फत वराला नोटीस पाठवून तीन दिवसांत माफी मागावी आणि 50 लाख रुपये भरपाईची मागणी केली आहे. तसे न केल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.
अधिवक्ता अरुण कुमार भदौरिया यांनी सांगितले की, रवीचा मुलगा वीरेंद्र रहिवासी आराध्या कॉलनी, बहादराबाद याचा विवाह 23 जून 2022 रोजी अंजू धामपूर जिल्हा बिजनौरसोबत होणार होता. वरमुलगा रवी याने आपला मित्र चंद्रशेखर मुसादिलाल (रा. देवनगर कंखल) याला लग्नपत्रिका वाटप करण्याची यादी केली.
हेही वाचा - ब्लॉगर तरुणीचा चौथ्या मजल्यावरुन पडल्याने जागीच मृत्यू; हत्येमागील दोन धक्कादायक पैलू CCTV मधून उघड
रविने सांगितल्यानंतर चंद्रशेखर याने मोना, काका, सोनू, कन्हैया, छोटू, आकाश या सर्वांना लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. तसेच 23 जून 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता लग्नाला यायचा आग्रह केला. वेळेनुसार सर्वच जण चंद्रशेखर सोबत सायंकाळी 4:50 वाजता दिलेल्या जागी पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना समजले की, वरात निघून गेली आहे.
यानंतर चंद्रशेख याने रविला संपर्क केला असता आम्ही निघून गेले आहेत. तसेच तुम्ही लोक वापस परत निघून जा, असे त्याने सांगितले. यानंतर सर्वांना दु:ख झाले आणि मानसिक त्रासही सहन करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.