राजस्थान, 15 जून: राजस्थानच्या बुंदीमध्ये (Bundi, Rajasthan) पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. आरोपी पतीने मुलांसमोर पत्नीचा गळा चिरला आणि आरोपी पळून गेला. घटनेच्या 5 तासांनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक केली. पत्नीच्या बोलण्याचा राग आल्याने त्याने स्वयंपाक बनवत असतानाच पत्नीला मारहाण करून कुऱ्हाडीने तिचा गळा चिरल्याचे आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय मंडळाकडून मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दुसरीकडे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच बुंदी जिल्ह्यात गेल्या 1 वर्षात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून 1 डझनहून अधिक खुनाच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला केली अटक मृत महिलेच्या मुलीनं या बाबतची माहिती दिली. आरोपींनी हत्या करुन घराला कुलूप लावून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच इंद्रगड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुलूप तोडले तेव्हा मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर घटनास्थळाची पाहणी करून एफएसएल वैद्यकीय पथकाला पाचारण करून मृतदेह इंदरगढ रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला व शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक घटनेनंतर इंद्रगडचे एसएचओ हरीश भारती यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके आरोपींच्या अटकेसाठी रवाना झाली. एफएसएल टीम आणि एमओबी टीमने घटनास्थळी वैज्ञानिक संशोधनासाठी पुरावे गोळा केले. गठित पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि माहिती देणारी यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा सक्रिय करून आरोपींच्या लपण्याच्या ठिकाणांचा शोध घेत अवघ्या 5 तासांत आरोपी गीताराम याला मंदिर गुढा येथून ताब्यात घेतले. 6 मुलांची धुलाई करतानाचा मुलीचा जबरदस्त Live Video चौकशीत आरोपीने हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला. पत्नीने ज्या प्रकारे वाद घालण्यास सुरुवात केली त्याचा राग येऊन त्याने कुऱ्हाडीने पत्नीचा गळा चिरल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.