जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Watch Viral Video: छेड काढणाऱ्या 6 मुलांना भररस्त्यात मुलीनं धू- धू धुतलं, कॅमेऱ्यात कैद झाली धुलाई

Watch Viral Video: छेड काढणाऱ्या 6 मुलांना भररस्त्यात मुलीनं धू- धू धुतलं, कॅमेऱ्यात कैद झाली धुलाई

Watch Viral Video: छेड काढणाऱ्या 6 मुलांना भररस्त्यात मुलीनं धू- धू धुतलं, कॅमेऱ्यात कैद झाली धुलाई

एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (video is going viral) होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून: आजकाल मुली खूप हुशार झाल्या आहेत आणि संकटातून स्वतःच्या मार्गानं कसं बाहेर पडायचे हे त्यांना माहित आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (video is going viral) होत आहे, ज्यामध्ये काही मुले एका मुलीला चारही बाजूंनी घेरतात आणि तिला त्रास द्यायला सुरु करतात. मात्र यावेळी मुलीने सर्वांना चोख उत्तर दिलं आहे. सामसूम रस्त्यावर मुलांनी मुलीला घेरलं इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्‍या आणि धमकावणार्‍या 6 मुलांना मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये 6 लोक एका सामसूम रस्त्यावर एका मुलीला घेरून त्रास देताना दिसत आहेत. व्हिडिओचे ठिकाण अद्याप समजू शकलेलं नाही. मुलगी मग त्या मुलांशी भांडते आणि मार्शल आर्ट्सच्या हालचालींसह फ्लाइंग किकसह त्यांना जमिनीवर पाडते. तिने सर्व 6 मुलांना एक एक करून पायाने लाथ मारून खाली पाडले. 25 सेकंदांचा हा व्हिडिओ ‘द फिगेन’ अकाउंटने ट्विटरवर या कॅप्शनसह पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा काही प्रतिक्रिया दिल्या त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुलीची थट्टा करू नका! हिया!’ व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 35 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि 9000 हून अधिक वेळा शेअर केले गेले आहेत.

जाहिरात

हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा अंदाज या व्हिडिओवरून लावता येतो. नेटिझन्स तिच्या शौर्य आणि सामर्थ्याने मोहित झाले होते, तर अनेकांनी असंतोष व्यक्त केला की महिलांना दररोज इतका त्रास सहन करावा लागतो. एका यूजरने लिहिले की, कोणत्याही मुलीला याचा सामना करावा लागू नये. तुमच्या मुलांना शिकवा की हे कधीही ठीक नाही. दुसऱ्याने लिहिले, ‘निंजाचे खरे उदाहरण.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात