Home /News /nagpur /

बलात्कार पीडितेनं YouTube Video पाहून केला स्वत:चा गर्भपात; नागपुरातील तरुणीची झाली भयंकर अवस्था

बलात्कार पीडितेनं YouTube Video पाहून केला स्वत:चा गर्भपात; नागपुरातील तरुणीची झाली भयंकर अवस्था

नागपुरातील एका बलात्कार पीडित तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून स्वत: चा गर्भपात केला आहे. (File Photo)

नागपुरातील एका बलात्कार पीडित तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून स्वत: चा गर्भपात केला आहे. (File Photo)

Crime in Nagpur: नागपुरातील यशोधरा नगर येथील एका बलात्कार पीडित तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून गर्भपात (abortion by watching youtube video) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    नागपूर, 26 सप्टेंबर: नागपुरातील (Nagpur) यशोधरा नगर येथील एका बलात्कार पीडित (Rape victim abortion) तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून गर्भपात (abortion by watching youtube video) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात कुणी नसताना पीडितेनं हे पाऊल उचललं आहे. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेनं आपल्या प्रियकराविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुरावा गोळ्या केल्यानंतर लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे. 24 वर्षीय पीडित तरुणी नागपुरातील यशोधरा नगर परिसरातील रहिवासी आहे. तिच मागील सहा वर्षांपासून सोहेल वहाब खान याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू होते. आरोपी सोहेलनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर अनेकदा बलात्कार केला होता. आरोपी सोहेलने तब्बल 50 हून अधिक वेळा बलात्कार केल्याचा आरोपी पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना देखील याबाबत माहिती होती. त्यानं गोड-गोड बोलून सर्वांना फसवलं आहे. दरम्यान आरोपीनं केलेल्या बलात्कारामुळे पीडित तरुणी गरोदर राहिली होती. हेही वाचा-पुण्यातील ढोल पथकाला हैदराबादमध्ये ठेवलं डांबून; थरारनाट्यानंतर 60 जणांची सुटका दरम्यान, सात महिन्यांची गरोदर असताना, अचानक पाय घसरून पीडित तरुणी खाली पडली. यामुळे तिच्या पोटात दुखू लागलं. वेळेपूर्वीच प्रसूती होऊ लागली. याची माहिती प्रियकर सोहेलला मिळताच, त्याने युट्यूबवरील व्हिडीओ पाहून गर्भपात करण्याचा सल्ला दिला. तरुणीनं स्वयंपाक घरातील काही वस्तूचा वापर करत घरीच बाळाला जन्म दिला. पण ते बाळ मृत होतं. दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या सोहेलनं पीडितेला समजावून बाळाला जवळच्या एका कबरस्थानमध्ये दफन केलं आहे. हेही वाचा-खरी ओळख लपवत पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार; 3 महिन्यांनी फुटलं बिंग या घटनेची माहिती पीडित मुलीच्या नातेवाईकांना कळल्यानंतर, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी प्रियकर सोहेल हा विवाहित असून तो पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुरावे गोळा केल्यानंतर लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच मेडिकल स्टाफच्या मदतीने दफन केलेल्या बाळाला पुन्हा बाहेर काढून या घटनेचा तपास केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur

    पुढील बातम्या