बांदा, 9 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) बांदा जिल्ह्यातील नरैनी नगर पंचायत येथील मोतियारी बाजारातील गोशाळेतील 50 गायींना जंगलात जिवंत दफन करण्यात आलं आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करीत अधिकाऱ्याचं (EO) निलंबन करण्यात आलं आहे. (Human havoc on animals More than 50 cows were buried alive in the forest)
यादरम्यान नरैनी येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार राज करन कबीर यांनी मुख्य दोषींविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात शासनाने कारवाई करीत येथी EO यांचं निलंबन केलं आहे.
हे ही वाचा-तेलंगणात धावत्या बसमध्ये जन्मल्या दोन मुली, परिवहन मंडळानं दिली अनोखी भेट
मुख्य विकास अधिकारी वेद प्रकाश मोर्य यांच्या रिपोर्टनुसार तब्बल 50 गायींना जिवंत दफन करण्याच्या या प्रकरणात इओ प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून आले आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार राजकरन कबीर यांनी सांगितलं की, छोट्या अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्यांनी आरोप लावत सांगितलं की, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पहाडी खेरा जंगलात 50 हून अधिक गायींना जिवंत दफन करण्यात आलं होतं. यामध्ये उपजिल्हाधिकारी नरैनीदेखील सामील होते. कबीर यांनी मुख्य विकास अधिकारीच्या तपासावर सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cow science, Uttar pradesh news