Home /News /national /

तेलंगणात दोन घटनांमध्ये धावत्या बसमध्ये महिलांची प्रसूती; जन्मलेल्या मुलींना परिवहन मंडळाची आयुष्यभराची भेट

तेलंगणात दोन घटनांमध्ये धावत्या बसमध्ये महिलांची प्रसूती; जन्मलेल्या मुलींना परिवहन मंडळाची आयुष्यभराची भेट

तेलंगणा राज्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धावत्या बसमध्ये महिलांची प्रसूती झाली. यात दोन्ही महिलांनी गोंडस मुलींना जन्म दिला आहे. या घटनेनंतर राज्य परिवहन मंडळाने (TSRTC) या दोन्ही मुलींना अनोखी भेट दिली आहे.

  हैदराबाद, 9 डिसेंबर : गर्भवती महिलांसाठी (Pregnant women) प्रवास करणं ही काहीशी जिकरीची गोष्ट आहे. तरीदेखील कधी अशी परिस्थिती तयार होते की एखाद्या गर्भवती महिलेला प्रवास करावाच लागतो. तेलंगणातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या रहिवासी असलेल्या दोन गर्भवती महिलांनादेखील काही कारणास्तव राज्य परिवहन मंडळाच्या बसनं प्रवास करावा लागला. बसमध्ये प्रवास करतानाच दोघींची प्रसूती झाली. दोघींनी दोन गोंडस मुलींना जन्म दिला. बसमध्ये जन्मलेल्या (Kids born on Bus) या दोन्ही मुलींना तेलंगणा राज्य परिवहन मंडळानं (TSRTC) अनोखी भेट दिली आहे. दोन्ही मुलींना टीएसआरटीसीच्या बसमधून आयुष्यभर मोफत प्रवास (Free travel) करता येणार आहे. टीएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हीसी सज्जनार यांनी याबाबत माहिती दिली. मुलींना दिलेल्या या पासमध्ये आंतरराज्यीय बस आणि विमानतळ विशेष बस यासारख्या सर्व प्रकारच्या बस सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्य परिवहन मंडळाचा आजीवन पास मिळालेल्या या दोन मुलींपैकी एकीचा जन्म, 30 नोव्हेंबर 2021 रोजी महबूबनगर जिल्ह्यातील पेड्डाकोतापल्ली गावाजवळ (Peddakothapally Village) चालत्या बसमध्ये झाला होता. तर, दुसऱ्या मुलीचा जन्म दोन दिवसांपूर्वी म्हणजे 7 डिसेंबर 2021 ला सिद्धीपेट (Siddipet) जिल्ह्याजवळ झाला होता. मुलींचा जन्म बसमध्ये झाल्यामुळं त्यांना आजीवन पास देण्याचा निर्णय टीएसआरटीसीनं घेतला.

  ऊर्जा वाढवण्यासाठी ही 5 नैसर्गिक पेय प्या, आरोग्यालाही होईल फायदा

  व्यवस्थापकीय संचालक व्हीसी सज्जनार (VC Sajjanar) यांनी याबाबत एक ट्विटही केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी दोन्ही मुलींच्या जन्माची माहिती दिली. बसमध्ये प्रसूती झालेल्या दोन्ही महिला टीएसआरटीसीच्या नियमित प्रवासी आहेत. प्रवासादरम्यान दोघींना प्रसूती वेदना (Labor pain) सुरू झाल्या. टीएसआरटीसी स्टाफनं (TSRTC staff) सहप्रवाशांच्या मदतीनं या महिलांची सुखरूप प्रसूती केली. त्यानंतर जवळच्या शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून या महिलांना रुग्णालयात पाठवण्यात आलं. दोन्ही महिला आणि नवजात मुलींची प्रकृती ठणठणीत असल्याचं, सज्जनार म्हणाले. तेलंगणा राज्यामध्ये राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय प्रवासी सेवा देण्याचं काम टीएसआरटीसी करते. या बससेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील जास्त आहे. आपल्या वाहनातून प्रवास करताना दोन मुलींचा सुखरूप जन्म झाला, यामुळं टीएसआरटीसीनं अनोख्या पद्धतीनं आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या पासमुळं दोन्ही मुलींना आता बसनं आजीवन मोफत प्रवास करता येणार आहे. परिवहन मंडळानं घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Pregnent women, St bus, Women

  पुढील बातम्या