TikTok, Helo तुम्हीही वापरत असाल तर बंदीनंतर सगळ्यात आधी करा हे काम

TikTok, Helo तुम्हीही वापरत असाल तर बंदीनंतर सगळ्यात आधी करा हे काम

देशात डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी भारत सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर इतर मोबाईल अ‍ॅप्स वापरणाऱ्यांसाठी खूप बदल होतील

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : देशात डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी भारत सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर इतर मोबाईल अ‍ॅप्स वापरणाऱ्यांसाठी खूप बदल होतील. खरंतर देशात तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्स ची प्रसिद्धी करण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे जाणून घेऊया ही नेमके कोणते बदल असतील.

सरकारने आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या कलम 69(ए) अंतर्गत सगळ्यांच्या आवडती आणि लोकप्रिय अशा tiktok टिक टोक आणि इतर 59 चिनी मोबाईल वर बंदी घातली आहे. या लिस्टमध्ये टिकटॉक व्यतिरिक्त Vigo Video, Shareit, UC Browser, Helo, Likee अशा ॲपचा समावेश आहे. यांचे भारतात मोठ्या संख्येने वापरकर्ते आहेत.

अनेक भारतीयांच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स असून त्यांनी यावर लॉगिन केलं आहे. त्यामुळे ॲप्सवर बंदी घातल्यानंतर त्यांचा डेट लिक होईल का अशी भीती भारतीयांना आहे. खास करून त्यांना ज्यांनी या ॲप्सवर स्वतःचा कन्टेन्ट क्रिएट केला आहे. सध्या टिक टोक हे ॲप एप्पल स्टोरवरून देखील काढून टाकण्यात आलं आहे.

(हे वाचा-आमीर खानच्या घरी पोहोचला कोरोना, आईचीही करणार COVID-19 चाचणी)

त्यामुळे लक्षात असू द्या की बंद केलेले आहे थेट तुमचा मोबाईल मधून डिलीट होणार नाहीत. पण या अ‍ॅप्स कनेक्शन काढून टाकण्यात आलं असेल. त्यामुळे फोन मधून डिलीट करण्याऐवजी फॅक्टरी रीसेट करा. त्या आधी तुमचा डेटा भाग करण्यासाठी विसरू नका. यासाठी टिक टोक वापरकर्त्यांना आपला डेटा सेव्ह करून भारतात तयार झालेल्या ॲपमध्ये तो रिस्टोअर करावा.

दरम्यान, देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल Apps आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे.

(हे वाचा-..म्हणून ठाण्यात 11 जुलैपर्यंत लॉकडाउन, पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट)

मालवेअर आणि संयशास्पद Apps ची मालवेअर आणि संशयास्पद अॅप्सची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही अ‍ॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 30, 2020, 1:32 PM IST
Tags: tiktok

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading