जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून ठाण्यात 11 जुलैपर्यंत लॉकडाउन, पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट

...म्हणून ठाण्यात 11 जुलैपर्यंत लॉकडाउन, पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट

...म्हणून ठाण्यात 11 जुलैपर्यंत लॉकडाउन, पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट

लॉकडाउन करणे म्हणजे फक्त लोकांना घरातून बाहेर पडू न देणे हे चुकीचे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 30 जून : लॉकडाउन करणे म्हणजे फक्त लोकांना घरातून बाहेर पडू न देणे हे चुकीचे आहे. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठोस उपाय योजना करुन कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली. ठाण्यात 2 जुलैपासुन लॉकडाउन लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्त स्वत: अनेक भागात जाऊन नागरिकांशी, लोक प्रतिनिधींशी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधत आहे. जेणेकरुन लॉकडाउनमध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, लोक प्रतिनिधींनी काय केले पाहिजे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, हे सर्व आयुक्त समजून घेत आहे. भाजप नेत्याने केले शरद पवारांचे समर्थन, गोपीचंद पडळकरांना झापले 2 जुलै ते 11 जुलै या लॉकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाची साखळी तोडून ठाण्यात  कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या कमी करायची आहे. जेणेकरुन यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल आणि बाधितांना योग्य उपचार मिळतील, असा विश्वास विपीन शर्मा यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवडकरांनो, तुम्ही मोडलेल्या नियमांमुळे काय परिणाम झाला हे एकदा वाचाच ठाणे मनपा हद्दीत लागू होणाऱ्या लॉकडाउन आधी आयुक्त विपीन शर्मा यांचे दौरे हे महत्वाचे मानले जात आहे. आयुक्तांच्या दौऱ्यामुळे सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. विपीन शर्मा हे  रोज विविध भागात पाहणी करणार आहेत. आज ठाण्यातील किसन नगर, भडवाडी या भागात आयुक्तांनी दौरा केला आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात