जाहिरात
मराठी बातम्या / देश / दहशतवाद्यांचे पंख ! भारतामध्ये शस्त्र पोहचवण्यासाठी होतोय ड्रोनचा वापर

दहशतवाद्यांचे पंख ! भारतामध्ये शस्त्र पोहचवण्यासाठी होतोय ड्रोनचा वापर

दहशतवाद्यांचे पंख ! भारतामध्ये शस्त्र पोहचवण्यासाठी होतोय ड्रोनचा वापर

भारतामध्ये दहशतवादी कृत्यांसाठी ड्रोनचा वापर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) कडून होत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 ऑगस्ट :  जम्मू-काश्मीरमधील कठुआ (Kathua in Jammu and Kashmir ) येथील धल्ली भागात 29 मे रोजी सकाळी पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. सकाळी 6-7 च्या सुमारास त्यांना आकाशात एक आवाज ऐकू आला. हा आवाज पाकिस्तानकडून (Pakistan) भारतीय हद्दीत (Indian territory) येत असलेल्या ड्रोनचा असल्याचं या कर्मचाऱ्यांना दिसलं. हे ड्रोन असल्याचं लक्षात येताच पोलीस दलाने त्या दिशेने बंदुकीचे 13-14 राउंड फायर केले आणि ते ड्रोन एका मोकळ्या मैदानात जमिनीवर पाडलं. या ड्रोनची जवळून तपासणी केल्यावर त्यात गोल्डन टेपमध्ये गुंडाळलेले पेलोड असलेले एक काळं हेक्साकॉप्टर (hexacopter) सापडलं. त्यानंतर कठुआ येथून बॉम्बशोधक पथक (बीडीएस) आणि जम्मूहून एका पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. त्यानंतर जम्मू बीडीएसच्या पथकाने हेक्साकॉप्टरपासून पेलोड वेगळे केले आणि त्यातून सात अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर (Under Barrel Grenade Launcher) शेल आणि तेवढेच मॅग्नेटिक बॉम्ब (Magnetic Bombs) सापडले. जम्मूतील राष्ट्रीय तपास एजन्सीने भारत सरकारच्या निर्देशांनुसार RC- 06/2022/NIA/JMU नावाने रजिस्टर्ड प्रकरणाचा तपास 30 जुलै रोजी ताब्यात घेतला. ड्रोन पाठवण्यामागे मोठा प्लॅन दरम्यान, लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) ही दहशतवादी संघटना इंटर-सर्व्हिसेस इंटिलिजन्स (ISI) आणि पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने शस्त्रं, दारूगोळा आणि स्फोटकं ड्रोनद्वारे सीमेपलीकडे पाठवत आहे, असं अधिकाऱ्यांनी सीएनएन-न्यूज18 ला सांगितलं. लष्कर-ए-तोयबा (एलईटी) जम्मू आणि काश्मीरमधील जिहादींना कट्टर बनवते आणि त्यांची भरती करतं. पुढे त्यांना सीमेपलीकडून पाठवण्यात येणाऱ्या या ड्रोनची डिलिव्हरी मिळते. त्यानंतर, द रेझिस्टन्स फ्रंटच्या (TRF) बॅनरखाली एलईटीचे अतिरेकी या जिहादी दहशतवाद्यांकरवी स्थानिक नसलेल्या आणि या राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना लक्ष्य करतात. पुतिन यांचा ‘ब्रेन’ समजल्या जाणाऱ्या अलेक्झांडर दुगिन यांच्या हत्येचा कट, कार स्फोटात मुलीचा मृत्यू काय आहे कामाची पद्धत? आयएसआय टार्गेटची निवड करतं आणि एलईटीच्या दहशतवाद्यांना शस्त्र तसंच पैसे पुरवतं दहशतवादी मास्टरमाइंड हाफिज सईदचा (Terror mastermind Hafiz Saeed) मुलगा तलहा (Talha) पाकिस्तानकडून या संपूर्ण ऑपरेशनच निरीक्षण करतो. तलहाला एप्रिल 2022 मध्ये भारतीय गृह मंत्रालयाने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. लाँच कमांडर साजिद जाटने अल्बर्ट उर्फ हमजा उर्फ रेमंड ग्रीन उर्फ डोनाल्ड ग्रीन या नावाने कार्यरत असलेल्या त्याच्या कॅडरद्वारे ड्रोनची डिलीव्हरी करण्याचं ठरवलं. साजिदने 2005 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती आणि काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. आपल्या कारवाया यशस्वी करता याव्या आणि काश्मीरात राहता यावं, यासाठी त्याने शब्बीरा कुचाय नावाच्या स्थानिक काश्मिरी महिलेशी लग्न केलं. साजिद आपल्या काश्मिरी पत्नीसोबत यारीपोरा येथे राहत होता. हे जोडपं 2007 मध्ये नेपाळमार्गे पाकिस्तानच्या लाहोरला पळून गेलं. पण त्यांनी त्यांच्या 15 दिवसांच्या उमर राजा फारूख नावाच्या मुलाला इथेच सोडून दिलं. त्यानंतर त्याच्या मुलाला पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं. सावधान! चुकूनही देऊ नका अशा मेसेजला रिप्लाय, आयुष्याची लागेल वाट पाकिस्तानने FATF ला ग्रे लिस्टमध्ये टाकल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या The Resistance Front ला पुन्हा उभं करण्यात साजिद जाटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्स दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. कारण ड्रोन हँडलर्सना प्रत्यक्ष सीमेच्या (IB किंवा LoC) अगदी जवळ असणं आवश्यक असते. त्यामुळे साधारणपणे ते सीमेवर पाकिस्तानी सुरक्षा चौक्यांमध्ये (Pakistani security posts) बसून रिमोट कंट्रोलचा वापर करून ड्रोन पाठवतात, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात