मुंबई, 23 ऑगस्ट: व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम हे खूप लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे स्कॅमर्स (Scammers) त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता व्हिडिओ कॉल करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता स्कॅमरच्या जाळ्यात अडकला तर त्याचंही खूप नुकसान होतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर किंवा व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल येत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अनेक वेळा युजर्स मेसेज पाठवून फसवण्याचाही प्रयत्न करत असतात. असाच एक मेसेज प्राप्त झालेल्या एका व्यक्तीनं त्याचा अनुभव सांगितला. त्यानं सांगितलं की त्याला इन्स्टाग्रामवर फॉलोची रिक्वेस्ट आली. फॉलो रिक्वेस्ट पाठवणारी एक मुलगी असते. यासोबतच त्यांना मेसेज रिक्वेस्टही मिळतात. यामध्ये त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं जातं. त्यांनी व्हिडिओ कॉल करताच समोर जी मुलगी असते, ती तिचे कपडे काढू लागते. त्यानंतर आपण लगेच कॉल कट करतो. परंतु कॉल कट होण्यापूर्वी ती काही स्क्रीनशॉट घेते. ज्यामध्ये आपला चेहराही असतो. यानंतर ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होतो. त्यानंतर सतत त्या आयडीवरून मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी त्यांना 24 तासांचा वेळही दिला जातो. पैसे न दिल्यास स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. हेही वाचा- मित्राने केली गम्मत अन् तरुणाने गमावले प्राण, वाढदिवसाच्या पार्टीत धक्कादायक घटना बदनामी होण्याच्या भीतीनं अनेकजण घोटाळेबाजांच्या जाळ्यात येतात. अशा परिस्थितीत अशा घोटाळ्यांपासून सावध राहणे गरजेचं आहे. सायबर एक्सपर्ट हिमांशू कुमार दीपू म्हणतात की सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी गांभीर्यानं घेतली पाहिजे. बहुतेक प्रकरणांमध्ये, ते अशी कोणतीही पोस्ट करत नाहीत. असं केल्यानं ते स्वत:च अडकू शकतात. कारण सोशल मीडियावर पोस्ट करून सायबर पोलिसांना त्यांच्या डिटेल्स मिळू शकतात. तथापि, ते पुढे सांगतात की, अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रयत्न करा. अनोळखी नंबर किंवा व्हिडीओ कॉलर्सकडून येणारे व्हिडिओ कॉल्स मेसेजला रिप्लाय देणं टाळावं. अनेक प्रकरणांमध्ये, स्कॅमर पैसे न दिल्याबद्दल वापरकर्त्याचे स्क्रीनशॉट पॉर्न साइटवर पोस्ट करतात. या कारणास्तव, अशा व्हिडिओ कॉल किंवा संदेशांना उत्तर देणे टाळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.