Home /News /lifestyle /

मुलांना कोरोनाची घालू नका भीती, असं ठेवा व्हायरसपासून सुरक्षित

मुलांना कोरोनाची घालू नका भीती, असं ठेवा व्हायरसपासून सुरक्षित

कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) मुलांना कशी माहिती द्यायची याबाबत युनिसेफने (UNICEF) मार्गदर्शन केलं आहे.

    मुंबई, 03 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) लॉकडाऊन (lockdown) करण्यात आला आहे. अशा वेळी सर्वात मोठी समस्या आहे ती पालकांसमोर. घरात बंदिस्त असल्यामुळे लहान मुलं अनेक प्रश्न विचारतात त्यांच्या या प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची, त्यांना कोरोनाबाबत कसं सांगायचं, त्यांच्या मनातली कोरोनाची भीती कशी दूर करायची, त्यांना कोरोनापासून कसं सुरक्षित ठेवायचं असे कित्येक प्रश्न पालकांसमोर आहेत. याबाबत युनिसेफने (UNICEF) मार्गदर्शन केलं आहे. मुलांना कोरोनाबाबत किती माहिती आहे ते विचारा सर्वत्र कोरोनची चर्चा आहे त्यामुळे मुलांनीही त्या ऐकलेल्या आहेत. मुलांना नेमके काय माहिती आहे ते विचारून घ्या. मुलांनी उत्तर दिल्यानंतर त्यांना माहिती असलेल्या कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत ते समजवून सांगा आणि योग्य ती माहिती त्यांना द्या. मुलांना सांगा अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वच्छतेचं महत्त्व सांगा वारंवार हात धुणे किती महत्त्वाचं आहे ते सांगा. याशिवाय टॉयलेट सीटला हात न लावणे, जमिनीवर पडलेला पदार्थ का खाऊ नये हे सांगा. तसेच तोंडाला सतत हात लावू नका, खेळणी कशी स्वच्छ ठेवायची ते सांगा. खोकताना, शिंकताना काय काळजी घ्यावी, सोशल डिस्टेंस कसं ठेवावे ते सांगावे. चुकीची माहिती देऊ नका किंवा घाबरवू नका मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून रोखण्यासाठी त्यांना घाबरवलं जातं मात्र असं करू नये. कारण याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होतो. जर तुम्ही तुमच्या मुलांना नीट समजावून सांगितलं तर ते काळजी घेतील. कोरोनाची भीती मुलांच्या मनात घालू नका. मुलांना सांगा ते घरात सुरक्षित आहेत आता घराबाहेर खेळायला जाऊ नका, त्यामुळे कोरोना होऊ शकतो, घरात तुम्ही सुरक्षित आहात हे सांगा. त्यांना धीर द्या. तुम्ही त्यांच्या सोबत आहात त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असा विश्वास त्यांना द्या. लॉकडाऊनमुळे वडिलांचे अंत्यसंस्कारही नाही करू शकली ही अभिनेत्री सलाम! दगडफेकीत जखमी होऊनही महिला डॉक्टर दुसऱ्याच दिवशी परतल्या ड्यूटीवर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या