'या' कारणामुळे मुंबईत जीवघेणा ठरतोय कोरोना, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता

'या' कारणामुळे मुंबईत जीवघेणा ठरतोय कोरोना, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता

महाराष्ट्र हे सध्या कोरोनव्हायरसच्या प्रादुर्भावाचे केंद्रबिंदू झाले आहे, आणि मुंबईचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट मानला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : भारतात कोरोनाचा वेग वाढत आहे, आतापर्यंत कोरोनारुग्णांचा आकजा 10 हजार पार गेला आहे. यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 3 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र हे सध्या कोरोनव्हायरसच्या प्रादुर्भावाचे केंद्रबिंदू झाले आहे, आणि मुंबईचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट मानला जात आहे.

राज्यातील पहिल्या 50 कोव्हिड-19 मृतांचा आकडा पाहिल्यास यातील एकट्या मुंबईत 62.9 मृत्यू झाले आहेत. मृतांच्या या आकड्यांवरून असे दिसून आले आहे की यापैकी निम्म्याहून अधिक रुग्णांचा मृत्यू हा एका तासाच्या आत किंवा रुग्णालयात दाखल झाल्याच्या एका दिवसानंतर झाला आहे. यांतील अर्ध्या प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या मृत्यूच्या आधी किंवा त्यांनंतर त्यांची चाचणी कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आली होती.

वाचा-सोशल डिस्टन्सिंग तीन तेरा, पिंपरीच्या भाजी मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड

राज्यात कोरोनाचा वाढता शिरकाव आणि मृतांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, राज्य सरकारच्या वतीने एक समिती या सगळ्याचा अभ्यास करणार आहे. यामध्ये कोव्हिड-19 तपासणीसाठी विलंब तर होत नाही आहे ना, हे पाहण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकार प्रत्येक प्रकरणात डेथ ऑडिट करण्यासाठी तज्ञांची बैठक घेत आहे.

वाचा-वांद्र्यात कामगारांचा उद्रेक, अफवा पसरविणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार – अनिल देशमुख

त्याचबरोबर गंभीर रुग्णांसाठी उपचार प्रोटोकॉल तयार करण्यासाठी सोमवारी नऊ सदस्यांची टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईतील गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी सहा रुग्णालये नेमण्यात आली आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीवर आधारित इंडियन एक्सप्रेसने पहिल्या 50 मृतांचे विश्लेषण केले.

- 14 रुग्णांचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांत मृत्यू झाला.-

- 26 रुग्णांचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर एका दिवसांनी झाला.

- 11 प्रकरणांत चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मृत्यू झाला. तर 14 प्रकरणात पॉझिटिव्ह आल्यानंतर काही तासांत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

- यात 39 पुरुष आणि 11 महिला आहेत.

वाचा-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काही तासांत काँग्रेस आमदार कोरोना पॉझिटिव्ह

तपासणीसाठी होत आहे विलंब?

मुंबईत मृतांच्या संख्या वाढवण्यामागे एक कारण निर्दशनास आले आहे. यातील एक कारण कोरोना चाचणीसाठी होत असणारा विलंब असू शकते. तज्ज्ञ आणि अधिका-यांनी केलेल्या अभ्यासानुसार, काही रुग्णांना उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले किंवा खाजगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये चाचणीसाठी फेऱ्या घालाव्या लागतात. तर, खोकला आणि सर्दीची सर्व प्रकरणे त्वरित तपासली गेली नाही. बर्‍याच रुग्णांनी आयसोलेशन किंवा क्वारंटाइनमध्ये न राहता घरी राहण्याचा उपाय निवडला यामुळेही मृतांची संख्या वाढली असण्याची शक्यता आहे. पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत, “लक्षणे आढळल्यानंतरही रूग्ण 3-4 दिवसांनी तपासणीसाठी येतात. कोव्हिड संसर्ग लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचीही प्रकरणे समोर आली आहे.”, असे सांगितले. त्यामुळे आता वाढत्या मृतांच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती या सगळ्याचा अभ्यास करणार आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: April 15, 2020, 9:10 AM IST

ताज्या बातम्या