मराठी बातम्या /बातम्या /देश /रेल्वे स्टेशन की भूत बंगला? सूर्यास्तानंतर येतात घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज; पाहा VIDEO

रेल्वे स्टेशन की भूत बंगला? सूर्यास्तानंतर येतात घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज; पाहा VIDEO

भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथं रात्रीच्या वेळी घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज येत (Horror railway station in India people avoid to go after sunset) असल्यामुळे तिकडे कुणीच फिरकत नाही.

भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथं रात्रीच्या वेळी घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज येत (Horror railway station in India people avoid to go after sunset) असल्यामुळे तिकडे कुणीच फिरकत नाही.

भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथं रात्रीच्या वेळी घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज येत (Horror railway station in India people avoid to go after sunset) असल्यामुळे तिकडे कुणीच फिरकत नाही.

धनबाद, 1 डिसेंबर: भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथं रात्रीच्या वेळी घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज येत (Horror railway station in India people avoid to go after sunset) असल्यामुळे तिकडे कुणीच फिरकत नाही. या रेल्वे स्टेशनवर भूतांचा वास असल्याची कहाणी गावकरी सांगतात. एकविसाव्या शतकातही भूताच्या कथांवर लोक विश्वास (Stories of ghost) ठेवतात आणि रेल्वे स्टेशनकडे फिरकण्याचा विचारही करत नाहीत. या अजब अंधश्रद्धेमुळे इथल्या रेल्वे स्टेशनचं रुपांतर खरोखरच भूत बंगल्यात झाल्याचं चित्र आहे. " isDesktop="true" id="637781" >

भूताची दहशत

धनबाद जिल्हयातील झरिया गावात असणारं हे रेल्वे स्टेशन एकेकाळी अत्यंत समृद्ध होतं. या ठिकाणी स्टेशन मास्तरपासून अनेक कर्मचारी काम करत होते. रेल्वे स्टेशनच्या आसपास अनेक दुकानंही होती आणि त्यांचा व्यवसाय उत्तम चालत असे. मात्र काही दिवसांपूर्वी या परिसरात भूत असल्याची अफवा पसरली आणि लोक घाबरू लागले.

सूर्यास्तानंतर होतो सन्नाटा

सूर्य मावळू लागल्यानंतर या परिसरात कुणीही फिरकत नाही. या रेल्वे स्टेशनवर एक तिकीट खिडकी सुरू ठेवण्यात आली असून तिथं एक कर्मचारी काम करतो. मात्र तेदेखील केवळ दुपारी चार वाजेपर्यंत. चारनंतर ही खिडकीदेखील बंद होते आणि सगळे आपापल्या घरी परतू लागतात. संध्याकाळी या रेल्वे स्टेशनवर एकही रेल्वे थांबत नाही. एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी गावात यायचं असेल, तर ती रेल्वेनं येत नाही. एक तर दुसऱ्या दिवशी सकाळी येतात आणि अगदीच गडबड असेल, तर रस्त्याच्या उपयोग करून गावात येतात. गावात या ठिकाणाची दहशत पसरली आहे.

हे वाचा- तुमच्या एका नजरेत कुणीही पडेल तुमच्या प्रेमात! तरुणीने दाखवला डोळ्याचा असा इशारा

रेल्वे स्टेशन नव्हे भूत बंगला

गावात या जागेची ओळख रेल्वे स्टेशन अशी आता राहिली नसून ती भूत बंगला अशी झाली आहे. गावातील प्रत्येकजण या जागेविषयी बोलताना त्याचा उल्लेख भूत बंगला असाच करतो. ज्योतिषाचार्य चंदन शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार जी जागा बराच काळ बंद राहते किंवा वापराशिवाय राहते, त्या जागी नकारात्मक शक्तींचा वास सुरू होतो. त्यामुळेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत असल्याचं ते सांगतात. तर रेल्वेनं या स्टेशनचा जीर्णोद्धार करून पुन्हा ते कार्यान्वित करावं, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

First published:
top videos

    Tags: History, Railway