दुबई, 09 जून : संयुक्त अरब अमिरातीच्या दुबईमध्ये एका 28 वर्षीय भारतीय अभियंताचा झोपेत मृत्यू झाला. नितीन चंद्रन आणि अथीरा गीता श्रीधरन यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच प्रसूतीसाठी दुबईहून भारतात परतण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या दोघांनी याचिका दाखल केल्यानंतर एका महिन्यापूर्वी अथीरा भारतात परतली. मात्र सोमवारी नितीनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
केरळमध्ये राहणारा मात्र नोकरीसाठी दुबईत असणाऱ्या नितीनला उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होता. सोमवारी झोपेत हृदयविकाराचा झटका आला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात बंदी असताना सुप्रीम कोर्टात पत्नीला मायदेशी पाठवण्यासाठी धाव घेतली होती या प्रकरणामुळं दोघं चर्चेत आले होते. 7 मे रोजी वंदे भारत मिशन अंतर्गत चंद्रनने पहिल्याच दिवशी दुबईहून आपल्या पत्नीला भारतात पाठवले आणि तो तेथेच राहिला. दरम्यान प्रवीणचा झोपेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रनचा मृतदेह रशीद रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्याची कोरोना चाचणी करण्यात येईल, त्यानंतर त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या शवगृहात पाठविला जाईल.
वाचा-24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 9987 नवीन रुग्णांची नोंद, तरी देशासाठी एक आनंदाची बातमी
कोर्टात दाखल केली होती रिट याचिका
27 वर्षीय भारतीय गर्भवती अथीरा गीता श्रीधरननं प्रसूतीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या महिलेनं सुप्रीम कोर्टात, प्रसूतीसाठी भारतात जाण्यास कोर्टानं परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केली होती. यासाठी त्यांनी रिट याचिका दाखल केली होती. 7 मे रोजी वंदे भारत मिशन अंतर्गत अथीरा गीता श्रीधरन भारतात आली. गीता पुन्हा दुबईला जाऊ शकत नाही, त्यामुळं पतीच्या मृत्यूनंतर मात्र तिला पुन्हा पतीला पाहताही येणार नाही.
वाचा-चीनचा खोटारडेपणा आला समोर, कोरोना संसर्गाबाबत सगळ्यात मोठा रिसर्चनं केली पोलखोल
संकलन, संपादन-प्रियांका गावडे.