मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

या देशात Political Islam वर पूर्णपणे बंदी; मशिदींबाबतही घेतला मोठा निर्णय

या देशात Political Islam वर पूर्णपणे बंदी; मशिदींबाबतही घेतला मोठा निर्णय

विविध देशांमध्ये सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाने मोठा निर्णय घेतला आहे

विविध देशांमध्ये सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाने मोठा निर्णय घेतला आहे

विविध देशांमध्ये सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाने मोठा निर्णय घेतला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

व्हिएन्ना, 13 नोव्हेंबर : राजकारणातील मुस्लिमांच्या कारावाया रोखण्यासाठी ऑस्ट्रियाच्या सरकारने (Austrian government) एक नवीन सुरुवात केली आहे. याअंतर्गत मुस्लीम नियंत्रित संघटना, इस्लामशी संबंधित शैक्षणिक व सामाजिक संस्थांची ओळख पटवून यापैकी राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे.

ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज (Sebastian Kurz) यांच्या मंत्रिमंडळाने त्या प्रस्तावांवर सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे दहशतवादी घटनांच्या दोषींना आयुष्यभर तुरुंगात राहावं लागू शकतं. याशिवाय दहशतवादी कारवाया करणाऱ्या दोषींच्या सुटकेनंतर त्यांच्यावर इलेट्रॉनिक पद्धतीने लक्ष ठेवणे आणि धार्मिक स्वरुपात प्रेरित कट्टरपंथींना दोषींच्या श्रेणीमध्ये सामील करण्याचा प्रस्ताव देखील सहभागी आहे.

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधातही कडक नियम

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कुर्ज यांनी ट्विट केलं आहे, की.. जे स्वत: दहशतवादी आहेत त्यांच्यावर तर कारवाई केली जाईलच, मात्र जे लोक दहशतवादी कारवायांसाठी जमीन किंवा आदी गोष्टींची मदत करतात, अशांवरही कारवाई केली जाणार आहे. आम्ही अशा लोकांसाठी गुन्ह्याची एक श्रेणी तयार करणार आहोत ज्याचं नाव राजकीय इस्लाम (Political Islam) असेल. याचा अर्थ इस्लामच्या राजकीय हस्तक्षेपालाही ऑस्ट्रिया सरकारने विरोध दर्शवला आहे.

इतकच नाही तर ऑस्ट्रिया अशी मशिदीदेखील बंद करण्याचे आदेश देणाऱ आहे, ज्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करतात. सरकारी एजन्सींनी सांगितले की, ऑस्ट्रियाच्या पोलिसांनी सोमवारी 60 हून अधिक अशा ठिकाणांवर छापेमारे केली आहे, जी कथित स्वरुपात कट्टरपंथी इस्लामवादाशी जोडलेली होती. सोबतच 30 संदिग्ध व्यक्तींची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हे ऑपरेशन व्हिएन्नामध्ये झालेल्या गोळीबाराच्या एक आठवड्यांनंतर चालविण्यात आलं आहे. ज्यामध्ये इस्लामिक स्टेट समुहाच्या समर्थकांनी 4 जणांची हत्या केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले की ही छापेमारी हल्ल्याशी संबंधित नाही.

हे ही वाचा-व्लादिमीर पुतिन तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत? जगाचा नाश करण्यासाठी तयार बंकर

व्हिएन्नामध्ये हल्ल्यानंतर फ्रान्सच्या नीसमध्येही एक हल्ला झाला होता. ज्यामध्ये ट्यूनीशियाई मूळ असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अशात हल्ले सुरू असल्याने फ्रान्सनेही मशिदी बंद करण्यास सुरूवात केली आहे आणि ज्या मशिदी द्वेष पसरवत आहेत अशा मशिदींचीही चौकशी केली जाणार आहे.

First published: