अमेरिकेतील निवडणुकीसाठी देशात केलं होम-हवन; भारतीयांचा कल कुणाकडे?

निवडणूक अमेरिकेत मात्र पूजा-अर्चा सुरू आहे भारतात...

निवडणूक अमेरिकेत मात्र पूजा-अर्चा सुरू आहे भारतात...

  • Share this:
    मेरठ, 2 नोव्हेंबर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यांत पूर्णपणे ताकद लावली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यशासाठी मेरळमधील अखिल भारत हिंदू महासभाने (All India Hindu Mahasabha) होम-हवन केलं आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे प्रदेश प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की विश्व शांतिसाठी ट्रम्प यांनीच राष्ट्रपती होणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टर दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. हिंदू महासभाने ट्रम्प यांना विजय भव: चा आशीर्वाद दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्यात अटीतटीची लढाई होणार आहे. दोघांमध्ये डिबेटची (US Presidential Debate) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. डिबेटमनंतर दोन्ही उमेदवारांची तुलना केली जात आहे. दोघांच्या व्यक्तीत्वापासून विचार आणि नीतींबाबतचा विचार याशिवाय व्यवहार यातील प्रत्येक पैलूंवर लक्ष्य ठेवले जात आहे. दोन्ही नेता एकमेकांपासून वेगळे आहेत. याबाबत मीडियामधूनही वारंवार विविध रिपोर्ट्स समोर येत आहेत. हे ही वाचा-बायडन यांच्या मुलाचा लॅपटॉपचा डेटा लीक, पॉर्न साइटवर लाइव्ह शोसाठी 15 लाख उडवले 77 वर्षीय बायडन सहा वेळा सिनेटर राहिले आहेत आणि पहिल्यांदा 1972 मध्ये निवडणूक जिंकले होते. अमेरिकेचे 47 वे उपराष्ट्राध्यक्ष असलेले बायडन यांनी यापूर्वी दोन वेळा डेमोक्रेटिक पक्षाने राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. दुसरीकडे 74 वर्षीय ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती झाले आणि यापूर्वी रिअल स्टेट डेव्हलपर आणि एकदा त्यांनी रिएलिटी शो होस्ट केला आहे. यंदा दोघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान अमेरिकेची निवडणूक कोरोना (Corona)काळातली सर्वात मोठी निवडणूक आहे. एका अभ्यासातून मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या रॅलीमुळे आत्तापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांनी प्राण गमवले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत 18 रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये 30 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. सॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या अभ्यासकांनी याबाबत माहिती दिली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: