

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना जो बायडन टक्कर देत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा हंटर बिडेन सध्या अमेरिकेतील माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. हंटर बिडेन याच्या जुन्या लॅपटॉपचा डेटा लीक झाला आहे. ज्यामधून त्याच्या आयुष्यातील अनेक कारनामे समोर आले आहेत.


डेलीमेलमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार हंटर बिडेनने एका रात्रीत न्यूयॉर्कच्या एक स्ट्रिप क्लबमध्ये 8 लाख रुपये खर्च केले होते. तर एका बिलावरुन अशी माहिती समोर आली आहे की, त्यांनी पॉर्न वेबसाइटवर लाइव्ह शो पाहण्यासाठी तब्बल 15 लाख रुपये खर्च केले होते.


रिपोर्टनुसार त्यांच्या लॅपटॅपमध्ये असा डेटा मिळाला आहे ज्यातून त्यांना ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. लीक झालेल्या डेटावरुन 50 वर्षांच्या हंटर बिडेनने एका रात्रीत हॉटेलमध्ये अनेक खोल्यांमध्ये राहण्यासाठी पैसे दिले, अशी माहिती समोर येते.


डेली मेलच्या रिपोर्टनुसार काही फोटोंवरुन असं दिसतं की हंटर बायडन कोकेनचा नशा करीत आहे आणि अज्ञात महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे. पहिल्या पत्नीपासून हंटर बायडनचं घटस्फोट झाला होता. घटस्फोटादरम्यान हंटर बायडनवर आरोप लावण्यात आला होता की, ते ड्रग्ज, दारू, स्ट्रिप क्लब आणि शारिरीक संबंध ठेवणाऱ्या महिलांना गिफ्ट देण्यात खूप पैसे खर्च करतात.