Home /News /national /

पत्नी झोपेत असताना डोक्यात घातली कुऱ्हाड, रक्ताने माखलेले अवस्थेतच गाठलं पोलीस स्टेशन

पत्नी झोपेत असताना डोक्यात घातली कुऱ्हाड, रक्ताने माखलेले अवस्थेतच गाठलं पोलीस स्टेशन

तो कुऱ्हाडीने पत्नीवर वारंवार वार करीत होता. रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीचा जीव घेतला. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे

    मुरादाबाद, 11 मे : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामध्ये घरगुती हिंसाचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचे वृत्त आले आहे. त्यानंतर मनाचा ठोका चुकवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील बिलारी नगरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत क्रुरपणे हत्या केली आहे. या आरोपीचे नाव बालूराम आहे. त्याने जमिनीवर झोपलेली आपली पत्नी सीमा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वारंवार वार केले आणि तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांसमोर त्याने पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. 2011 मध्ये बालूराम व सीमा यांचा विवाह झाला होता. बालूराम यांने पोलिसांना सांगितले की, सीमा स्वत:जवळ दोन मोबाइल फोन ठेवत होती आणि नेहमी मुलांसोबत फोनवर बोलत असे. दोन मोबाइल ठेवण्याच्या संशयावरुन बालूराम याने सीमाची हत्या केली. अनेकदा पत्नीला फोनवर बोलू नको असे सांगूनही ती ऐकत नसल्याचे बालूरामने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बालूरामच्या घरी जाऊन सीमाचा मृतदेह ताब्यात घेतला. सांगितले जात आहे की 2011 मध्ये बालूरामने आपल्या पत्नीला 10000 रुपयांत विकत घेतले होते. तिला 3 मुलं आहेत. रात्री उशिरा जेव्हा बालूराम घरी पोहोचला तेव्हा त्याने पत्नीला रंगेहात पकडलं. पत्नीने विरोध केल्यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार केले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. हे वाचा -‘बाबा मला नाही जायचं’..4 वर्षांची कोरोनाग्रस्त चिमुरडी ओक्साबोक्शी लागली रडू चालत गावी निघालेल्या महिलेने रस्त्यातच दिला बाळाला जन्म, प्रसूतीनंतरही...
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या