Home /News /national /

‘बाबा मला नाही जायचं’..4 वर्षांची चिमुरडी ओक्साबोक्शी लागली रडू; अॅम्ब्युलन्स पाहून बापही गहिवरला

‘बाबा मला नाही जायचं’..4 वर्षांची चिमुरडी ओक्साबोक्शी लागली रडू; अॅम्ब्युलन्स पाहून बापही गहिवरला

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. अगदी 20 दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

    भोपाळ, 11 मे : 4 वर्षांच्या कियाराने  (नाव बदलले आहे) आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडून ठेवला होता. जशी रुग्णवाहिका जवळ आली तशी ती ढसाढसा रडू लागली. बाबा मला नाही जायचं...मला घरी घेऊन चला...मात्र बापाकडे पर्याय नव्हता. लेकीवर खूप प्रेम आहे. मात्र ती कोरोनासारख्या भयंकर आजारातून बरी होणं गरजेचं आहे. पापाने जागीच अवंढा गिळला आणि मुलीला आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यासाठी पुढे सरकला. जहांगीराबाद हा शहरातील धोकादायक हॉटस्पॉट आहे. येथे दररोज 15 ते 20 कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) रुग्ण सापडतात. आतापर्यंत येथे 180 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या इतर भागांच्या तुलनेत जहांगीराबादमधून दररोज 300 सॅपल घेतले जातात. कियारा रडत असल्याचे पाहून तेथील एक आरोग्य अधिकारी म्हणाला, ‘बाळा तू लवकर बरी होशील. तिथे तुला खूप चॉकलेट्स मिळतील.’ चॉकलेटचं कारण कामी आलं होतं, यानंतर कियारा आपल्या वडिलांसह रुग्णवाहिकेत बसण्यास तयार झाली. बाबांना हात मात्र तिने गच्च धरून ठेवला होता. 4 वर्षांची कियारा आपल्या कुटुंबासह जहांगीराबाद भागात राहते. तिच्या भागातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. जेव्हा कियाराचा रिपोर्ट मिळाला तेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तिला रुग्णालयात भरती करण्यासाठी घरी पोहोचले. कियारा रुग्णवाहिका पाहून घाबरुन गेली. तिने वडिलांचा हात घट्ट पकडला आणि रुग्णवाहिकेत बसेपर्यंत सोडला नाही. भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये लहान मुलांची संख्याही मोठी आहे. अगदी 20 दिवसांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली होती व त्यातून तो बरा झाला आहे. संबंधित-धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार; आरोपीसह कैदीही क्वारंटाईन चांगली बातमी! 45 वर्षे खाकी वर्दीसाठी तैनात असलेल्या योद्ध्याने कोरोनाला हरवलं
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या