मराठी बातम्या /बातम्या /देश /

'प्रेम की गंगा बहाते चलो...' मुस्लीम मुलीच्या लग्नाचं हिंदू कुटुंबीयांनी दिलं आमंत्रण

'प्रेम की गंगा बहाते चलो...' मुस्लीम मुलीच्या लग्नाचं हिंदू कुटुंबीयांनी दिलं आमंत्रण

लग्न झाल्यानंतर साजेदा जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा सज्जन कुंवर यांचे डोळे पाणावले. तिला सासरी पाठवताना त्यांना गहिवरून आलं. रक्षाबंधन आणि भाऊबिजेला तिला माहेरी पाठवण्याचं वचन त्यांनी साजेदाच्या सासरच्या मंडळींकडून घेतलं...

  • Published by:  Arti Kulkarni

सुधीर जैन

रतलाम (मध्य प्रदेश) 10 फेब्रुवारी : रतलाममधल्या हाथीखाना परिसरात एका हिंदू महिलेने मुस्लीम तरुणीच्या लग्नाआधी सगळ्यांना भोजन दिलं आणि धार्मिक सलोख्याचा एक अनोखा आदर्श घालून दिला. हाथीखाना मधल्या रहिवासी सज्जन कुंवर यांनी सगळ्यांना लग्नघराच्या भोजनाचं आमंत्रण दिलं. सज्जन कुंवर यांच्या शेजारी युसूफ खान राहतात. युसूफ खान यांना 3 मुलं आणि एक साजेदा बी नावाची एक मुलगी आहे. हे भाऊबहीण लहानपणापासूनच सज्जन कुंवर यांच्या मुलांशी खेळायला यायचे. सज्जन कुंवर यांनी साजेदावर आईसारखं प्रेम केलं आणि साजेदाचंही त्यांच्याशी असंच नातं आहे.

प्रेमाने केलं लहानाचं मोठं

साजेदाचे वडील अन्सार खान सांगतात, सज्जन कुवर यांनी साजेदाला अगदी यशोदेच्या मायेने मोठं केलं आहे. साजेदाला जाहिदा यांनी जन्म दिला पण सज्जन कुंवर यांनीच तिला मोठं केलं. यामुळेच साजेदाच्या लग्नाला आलेल्यांचा पाहुणचार सज्जन कुंवर यांनी मोठ्या मायेने केला.सज्जन कुंवर यांनी 400 पेक्षा जास्त पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं. यामध्ये सगळ्या जाती-धर्माचे लोक सहभागी झाले होते. सजन कुंवर यांनी याचा सगळा खर्च केला. इथे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं.

(हेही वाचा : 'मिशन हनी' : या महिलेने मधाचं उत्पादन करून मिळवले साडेचार लाख)

साजेदाला निरोप देताना...

सज्जन कुंवर सांगतात,  साजेदा बी 3 वर्षांपूर्वी इंदौरला उर्दू आणि कुराणचं शिक्षण घेण्यासाठी गेली होती. ती तिथे दीड वर्षं राहिली. तिला डाळभात खूप आवडायचा. जेव्हाजेव्हा घरात डाळभात बनत असे तेव्हातेव्हा सज्जन कुंवर यांना साजेदाची आठवण यायची. त्यामुळे मग त्यांनी डाळभात करणं सोडून दिलं. साजेदा पुन्हा रतलामला आली तेव्हा त्यांनी तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले.

लग्न झाल्यानंतर साजेदा जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा सज्जन कुंवर यांचे डोळे पाणावले. तिला सासरी पाठवताना त्यांना गहिवरून आलं. रक्षाबंधन आणि भाऊबिजेला तिला माहेरी पाठवण्याचं वचन त्यांनी साजेदाच्या सासरच्या मंडळींकडून घेतलं...धर्माच्या नावाखाली तेढ पसरवणाऱ्या स्वार्थी माणसांनी सज्जन कुंवर यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

=============================================================================

First published: