एकजूट भारत! मध्यरात्री उठून 500 मुस्लीम कैद्यांसाठी न्याहरी तयार करतात हिंदू बांधव

एकजूट भारत! मध्यरात्री उठून 500 मुस्लीम कैद्यांसाठी न्याहरी तयार करतात हिंदू बांधव

कोरोनाच्या संकटात एकसंध राहून लढणं आवश्यक आहे. त्याचा प्रत्यय या कैद्यांच्या हिंदू-मुस्लीम बंधुप्रेमातून येतो.

  • Share this:

भोपाळ, 8 मे : देशभरात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) हाहाकार सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाने एकजुटीने या संकटाशी सामना करणं आवश्यक आहे. देश एकसंध असेल तर कोरोनाचं संकटही पार करणं अवघड जाणार नाही. असंच एक प्रेरणादायी उदाहरण कैद्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. भोपाळ सेंट्रल जेलमध्ये कोविड 19 च्या जीवघेण्या आजारात हिंदू-मुस्लिमांमधील बंधूप्रेम अबाधित आहे. सध्या रजझानचा पवित्र महिना सुरू आहे. मुस्लिमांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो.

अशात तुरुंगातील 150 हिंदू कैदी मुस्लीम कैद्यांसाठी मध्यरात्री उठून सहरी म्हणजेच न्याहरी तयार करतात. इतकचं नाही तर सायंकाळी इफ्तारीसह जेवणही हिंदू कैदीच तयार करतात. भोपाळ तुरुंगात तब्बल 3000 कैदी आहेत. यापैकी 500 कैदी मुस्लीम आहेत. या सर्व मुस्लीम कैद्यांचा रोजा सुरू आहे.

तुरुंग प्रशासनाकडून मुस्लीम कैद्यांची घेतली जातेय काळजी

लॉकडाऊनपूर्वी तुरुंग प्रशासनाव्यतिरिक्त बाहेरील संस्थांकडून इफ्तारी आणि खाण्याची व्यवस्था केली जाते. या मुस्लीम कैद्यांसाठी मध्यरात्री 3 वाजता उठून 150 हिंदू कैदी सहरी तयार करतात. या सहरीत कैद्यांना चहा आणि रोटी दिली जाते. शिवाय सायंकाळी इफ्तारीची जबाबदारी हिंदू कैद्यांवर आहे. यामध्ये कलिंगड, फळे, खजूर आणि दूध दिले जाते. सायंकाळचे जेवणही हेच तयार करतात. जेवण बनविताना आणि नमाज अदा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. मुस्लीम कैद्यांना जेवणात वरण-भात, भाजी आणि पोळी दिली जाते. त्याचा रोजा सुरू असल्याने मुस्लीम बांधवांवर ताण येऊ नये यासाठी हिंदू बांधवांकडून या महिन्यातील संपूर्ण जेवणाची जबाबदारी घेतली जात आहे.

संबंधित -अख्ख्या कुटुंबाने घेतलं देशसेवेचं व्रत; कोरोना योद्ध्यांच्या कर्तृत्वाला सलाम

आजीच्या मृत्यूनंतर नातवाची आत्महत्या, डॉक्टरांनी केली कोरोना चाचणी आणि...

First published: May 8, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या