आजीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं नातवाची आत्महत्या, नंतर केली कोरोना चाचणी आणि...

बुधवारी या युवकाच्या आजीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

बुधवारी या युवकाच्या आजीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

  • Share this:
    जोधपूर, 08 मे : आपल्या आजीच्या मृत्यूच्या धक्क्यानं सूर्यनगरी जोधपूरमध्ये एका 23 वर्षीय युवकानं गळफास लावून आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळं संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. दरम्यान पोलिसांनी मृत तरुणाची कोरोना चाचणी केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे या तरुणाच्या मृतदेहावर कोरोना प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या नवीन रोड भागात राहणाऱ्या युवकाने बुधवारी रात्री घराच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची तपासणी केली. कोरोना तपासणी करण्यासाठी डॉक्टरांनी नमुना घेतला. गुरुवारी सायंकाळी झालेल्या तपासणीत या युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जोधपूरमध्ये या युवकासह 16 जणांचा आता कोरोना येथे मृत्यू झाला आहे. कोरोना प्रोटोकॉलनुसार होणार अंत्यसंस्कार बुधवारी या युवकाच्या आजीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. तेव्हापासून तो धक्क्यात होता आणि रात्री त्याने आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं. तुम्हाला कोरोनापासून वाचवणारा साबण 4500 वर्षांपूर्वीच असा तयार झाला पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. महात्मा गांधी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांचे शरीर सुरक्षित ठेवले आहे. आता डब्ल्यूएचओने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार प्रशासनाकडून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जोधपूरमध्ये कोरोनाचे 903 रुग्ण राजस्थानची राजधानी जयपूरनंतर जोधपूर हे कोरोनाचे सर्वात मोठे हॉट स्पॉट आहे. आतापर्यंत येथे 903 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जोधपूर शहरातील 9 पोलीस स्टेशन भागात संपूर्ण बंदी आहे. अन्य 5 पोलीस स्थानकांमध्येही कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शहरातील कबूतर चौक आणि नागौरी गेट ही कोरोनाची प्रमुख केंद्रे आहेत. फळं आणि भाजी खरेदीला जाताय, काळजी घ्या...नाहीतर घरी कोरोनालाही आणाल
    First published: