मराठी बातम्या /बातम्या /देश /"या"ठिकाणी मुस्लिम करताय 'नवरात्रीचे उपवास' तर हिंदू ठेवताय 'रोजे', VIDEO

"या"ठिकाणी मुस्लिम करताय 'नवरात्रीचे उपवास' तर हिंदू ठेवताय 'रोजे', VIDEO

तुरुंगातील दृश्य

तुरुंगातील दृश्य

देशातील या कारागृहात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडत आहे.

हरिकांत शर्मा, प्रतिनिधी

आग्रा, 25 मार्च : एकीकडे अनेक ठिकाणाहून जातीय हिंसाचाराच्या घटना समोर येत असतात. तर दुसरीकडे आग्रा येथून जातीय सलोख्याचे उदाहरण अनोखे उदाहरण समोर आले आहे. आग्राच्या सेंट्रल जेलमध्ये नवरात्रीच्या काळात देवीची गाणी म्हटली जात आहेत. हिंदू आणि मुस्लिम कैद्यांनी दोन धर्मांमधील वाढती द्वेषाची दरी भरून काढण्याचा अद्भुत संदेश दिला गेला आहे. कारागृहात नवरात्री आणि रमजान हे दोन्ही सण उत्साहात साजरे केले जात असून अनेक मुस्लिम कैद्यांनी देवीसाठी नवरात्रीमध्ये 9 दिवसांचा उपवास केला आहे.

बंधुत्वाचे दर्शन - 

कारागृहात मुस्लीम धर्माचे कैदी रमजानचे तर हिंदू धर्मातील कैदी नवरात्रीमध्ये देवीचे उपवास करत आहेत. यासोबतच अनेक मुस्लिम कैद्यांनी देवीचे 9 दिवस उपवास करून सामाजिक सलोख्याचा आदर्श ठेवला आहे. हे कैदी रोज एकत्र देवीचा दरबार भरवतात. ते भजनांवर नृत्य करतात, गातात आणि बंधुत्वाचे दर्शन याठिकाणी घडवतात.

905 कैद्यांनी ठेवले उपवास -

बुधवारपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. मंदिरांमध्ये पूजा केली जात आहे. आग्रा मध्यवर्ती कारागृहातही 905 कैद्यांनी उपवास केला आहे. नवरात्रीनिमित्त कारागृहात पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी पूजेनंतर सुंदरकांड पाठ व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात कैदी भजन करत आहेत. हिंदूंसोबत सुमारे 25 मुस्लिम कैदी आहेत, जे मंदिरात एकाग्रतेने भजन करत आहेत.

" isDesktop="true" id="855545" >

मंदिरात भजन करणार्‍या मुस्लिम कैद्यांमध्ये नवरात्रीचे उपवास करणारे पाचही आहेत. कैदी नौशादने सांगितले की, तुरुंगात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहतात. आता प्रत्येकजण कुटुंबासारखा आहे. देव आणि अल्ला हे एकच रूप आहे. अशा परिस्थितीत त्याने नवरात्रीचा उपवासही ठेवला आहे. मंदिरात पूजा केली जाते. याशिवाय अनेक हिंदू बांधव आहेत, जे त्यांच्यासोबत रमजानमध्ये उपवास करतात. बाकी मुस्लिम कैद्यांबरोबरच हिंदू बांधवही रोज उपवास सोडतात. धर्म आणि जातीच्या मुद्दयावर तुरुंगात कोणताही मदभेद नाहीए.

पंतप्रधान मोदी यांनाही मिठाईची भुरळ; या मिठाईची चवच न्यारी, पाहा VIDEO

कारागृहात नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्याकाळात कैद्यांसह प्रभारी डीआयजी आणि तुरुंग अधीक्षक राधाकृष्ण मिश्रा आणि उप जेलर आलोक सिंह उपस्थित होते. त्यांनी पूजा-अर्चना केली, त्यानंतर भजनही केले. कारागृह अधीक्षकांनी सांगितले की, नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्यांसाठी फळांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा कैद्यांना दूध, फळे आणि उकडलेले बटाटे यांच्यासोबत फळ आहार दिला जाईल. त्याचप्रमाणे रमजानमध्ये उपवास करणाऱ्या कैद्यांसाठी दूध आणि खजूरची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कैद्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिल्याचे मिश्रा सांगतात. तसेच मध्यवर्ती कारागृह पूर्वीसारखे राहिलेले नाही. आता त्याचे प्रशिक्षण केंद्रात रूपांतर झाले असून येथील कैदीही आपल्या पायावर उभे आहेत.

First published:
top videos

    Tags: Agra, Hindu, Local18