सिमला, 12 मार्च : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे शंकराचा अवतार आहेत, असा दावा हिमाचल प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश भारद्वाज (Suresh Bhardwaj) यांनी केला आहे.महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) निमित्तानं सिमलामधील राम मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. काय म्हणाले भारद्वाज? सुरेश भारद्वाज यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना ही थेट शंकराशी केली. ‘शंकराचे अवतार म्हणून नरेंद्र मोदी प्रकटले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर निकालापूर्वी मोदी दोन दिवस केदारनाथच्या गुहेत होते. त्यानंतर त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. असा दावा भारद्वाज यांनी केला. भारद्वाज पुढे म्हणाले की, भारताने अन्य देशांच्या तुलनेत कोरोना महामारीचा (corona pandemic) सामना चांगला केला आहे. भारतामध्ये विकसित देशांपेक्षा मृत्यूदर कमी आहे. मोदींना शंकराचे वरदान प्राप्त असल्यानेच त्यांनी या संकटाचा चांगल्या पद्धतीने सामना केला. या अनुभवानंतर संपूर्ण जग त्यांच्याकडे नेता म्हणून पाहत आहे, असेही भारद्वाज यांनी यावेळी सांगितले. ( वाचा : महाशिवरात्रीच्या दिवशी ताजमहालमध्ये शंकराची पूजा, सुरक्षा जवानांचा हस्तक्षेप! ) शिवरात्री महोत्सवाला सुरुवात हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय शिवरात्री मोहत्सव शुक्रवारपासून सुरू होणार आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर (Jai Ram Thakur) याचे उद्घाटन करणार आहेत. हा मोहत्सव सात दिवस चालणार असून यामध्ये अनेक पंजाबी गायक तसेच स्थानिक कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







