Home /News /crime /

Ex Boyfriendनं भरगच्च बसमध्ये महिलेवर 30 वेळा चाकूनं केले सपासप वार, प्रवासी बघ्याच्या भूमिकेत

Ex Boyfriendनं भरगच्च बसमध्ये महिलेवर 30 वेळा चाकूनं केले सपासप वार, प्रवासी बघ्याच्या भूमिकेत

बसमध्ये एका व्यक्तीनं आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर (Ex girlfriend) चाकूनं तीसहून अधिक वेळा चाकूनं वार केले. चाकूचा वार होताच ही महिला मोठमोठ्यानं ओरडत होती आणि मदतीची मागणी करत होती.

    नवी दिल्ली 23 फेब्रुवारी : माणसांनी भरलेल्या एका बस(Bus)मध्ये एक व्यक्ती महिलेवर चाकूनं सपासप वार करत आहे आण बसमधील सगळे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, ही गोष्ट ऐकल्यावर खरं तर नवलच वाटेल. मात्र, हे प्रत्यक्षात घडलं आहे. मॅक्सिकोमधील प्रवाशांवी गच्च भरलेल्या एका बसमध्ये. या बसमध्ये एका व्यक्तीनं आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर चाकूनं तीसहून अधिक वेळा चाकूनं वार केले. चाकूचा वार होताच ही महिला मोठमोठ्यानं ओरडत होती आणि मदतीची मागणी करत होती. मात्र, कोणीच तिला मदत केली नाही आणि सगळे बसमधून खाली उतरुन निघून गेले. मात्र, 30 वेळा शरीरात चाकू खुपसल्यानंतरही ही महिला जिवंत राहिली. सिनालोआ शहरात घडलेल्या या घटनेनं सगळेच हैराण झाले. 33 वर्षांच्या या महिलेला भेटण्यासाठी तिचा एक्स बॉयफ्रेंड ( Ex Boyfriend) निघाला आणि अचानक तिच्यावरच हल्ला करू लागला. या हल्ल्यानंतर महिला मोठमोठ्यानं रडत मदत मागत होती. या महिलेवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तीसहून अधिक वेळा चाकूनं वार केले. या घटनेनंतरही महिला जिवंत राहिली. महिलेनं थंडी असल्यानं बचावासाठी खूप मोठं विंटर जॅकेट घातलं होतं. या जॅकेटमुळे तिच्या कोणत्याही महत्त्वाच्या अवयवांपर्यंत चाकू पोहोचू शकला नाही. यामुळे या भयंकर हल्ल्यानंतरही तिचा जीव वाचला. बसमध्ये उपस्थित लोकांनी महिलेची मदत करण्यास तेव्हाच सुरुवात केली, जेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड हल्ला केल्यानंतर तिथून फरार झाला. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला जेव्हा ताब्यात घेण्यात आलं, तेव्हा त्यानं स्वतःला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या घटनेत संबंधित महिलेच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मेक्सिको एटर्नी जनरल एलेंजाद्रो मनेरोच्या म्हणण्यानुसार, मेक्सिकोमध्ये मागील काही वर्षात महिलांविरोधातील हिंसेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षात या घटनांमध्ये 137 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Attack, Crime news

    पुढील बातम्या