मंडी (हिमाचल प्रदेश), 11 जून : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळं दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मंडी इथं नुकताच एक भीषण अपघात झाला, या अपघातात वाहनचालक स्वत: आपल्या गाडीखाली चिरडला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी उपविभाग गोहरमधील बाधूजवळ संजाळा रोडवर अपघात झाला. यात वाहनचालकाचा गाडी खाली येऊन जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नाव कोल्लू राम उर्फ बंटी (वय 44), भरमोठ पोस्ट ऑफिस येथे राहणारा अशी झाली आहे. स्थानिक पंचायत प्रमुख भीमसिंह ठाकूर यांनी सांगितले की, बुधवारी बंटी आपल्या जीपच्या कामाच्या संदर्भात घराबाहेर पडला. बाढुजवळ संजळा रोडवर चालकानं जीप उतारावर भी केली. मात्र अचानक गाडी उतारावरून खाली आली, आणि वाहन चालकाच्याच अंगावरून गेली. कारच्या खाली आल्याने चालक बंटीचा जागीच मृत्यू झाला. वाचा- प्रेमात अडथळा बनला मामा, प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं असा काढला काटा प्रधान यांनी तातडीने पोलीस स्टेशन गोहर यांना अपघाताची माहिती दिली. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटल सुंदरनगर येथे पाठविला. मृतांच्या घरच्यांना तातडीने मदत म्हणून प्रशासनाने 20 हजार रुपये दिले आहेत. स्टेशन प्रभारी गोहर सूरम सिंह यांनी सांगितले की पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. एसपी मंडी गुरदेव चंद शर्मा यांनी या प्रकरणाची पुष्टी केली आहे. वाचा- कुत्र्याला वाचवण्याच्या केला प्रयत्न, कार विहिरीत कोसळून पत्नीसह मुलांचा मृत्यू संपादन, संचालक-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.