मराठी बातम्या /बातम्या /देश /Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचलमध्ये भाजप संकटात! महाराष्ट्रातला मोठ्या नेत्यावर जबाबदारी?

Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचलमध्ये भाजप संकटात! महाराष्ट्रातला मोठ्या नेत्यावर जबाबदारी?

आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पिछाडीवर टाकत काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पिछाडीवर टाकत काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पिछाडीवर टाकत काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Himachal Pradesh, India

शिमला 08 डिसेंबर : गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीनंतर मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सुरुवातीचे कल समोर येत आहेत. यानुसार एक्झिट पोलमधून समोर आल्याप्रमाणेच गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर, हिमाचलमध्ये मात्र सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

Gujarat Election Results 2022 LIVE : गुजरातमध्ये भाजप 146 जागांनी आघाडीवर,ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला पिछाडीवर टाकत काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून महाराष्ट्राचील एका बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे सध्या शिमलामध्ये दाखल झाले आहेत. विनोद तावडे आणि मंगल पांडे हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या आप आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. नुकतंच समोर आलेल्या कलानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये सध्या काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 33 जागांवर पुढे आहे. याशिवाय ४ अपक्ष आमदारही सध्या आघाडीवर आहेत.

Election Result: मोदींना मोठा धक्का; गुजरात नव्हे तर 'या' राज्यात काँग्रेसचा डंका, धक्कादायक निकाल

गुजरातमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार, भाजज 146 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळताना दिसत आहे. तर काँग्रेस केवळ 22 जागांवर आघाडीवर आहे. आप आतापर्यंत 9 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

First published:

Tags: BJP, Himachal pradesh