मराठी बातम्या /बातम्या /देश /

गुजरातमधील विजयाच्या आनंदापेक्षा हिमाचलमधला पराभव भाजपच्या जास्त जिव्हारी लागणारा, ही आहेत 4 कारणं

गुजरातमधील विजयाच्या आनंदापेक्षा हिमाचलमधला पराभव भाजपच्या जास्त जिव्हारी लागणारा, ही आहेत 4 कारणं

गुजरातमधील सध्याच्या कलाचे आकडे बघता भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय ठरू शकतो. मात्र, गुजरातमधील या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापेक्षाही हिमाचल प्रदेशमधील पराभव भाजपसाठी जास्त जिव्हारी लागणारा असू शकतो. याची काही कारणं जाणून घेऊ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Himachal Pradesh, India
  • Published by:  Kiran Pharate

शिमला 08 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजतापासून सुरुवात झाली आहे. दोन्ही राज्यांतील कलही समोर आले आहेत. यानुसार, गुजरातमध्ये भाजपला तर हिमाचलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. गुजरातमधील सध्याच्या कलाचे आकडे बघता भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय ठरू शकतो. मात्र, गुजरातमधील या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापेक्षाही हिमाचल प्रदेशमधील पराभव भाजपसाठी जास्त जिव्हारी लागणारा असू शकतो. याची काही कारणं जाणून घेऊ.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हिमाचलमधील 68 जागांमध्ये 38 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. 4 जागा काँग्रेसने आतापर्यंत जिंकल्या आहेत. भाजप 27 जागांवर आघाडीवर असून 5 जागा जिंकल्या आहेत. तर ३ अपक्ष उमेदवार आघाडीवर असून एक जागा अपक्षाने जिंकली आहे.

Gujarat Election Results : गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ कसं फुललं? भाजपच्या विजयाची Inside Story

हिमाचल प्रदेशात भाजपने गेल्यावेळी 44 जागा मिळवल्या होत्या. तसेच जयराम ठाकूर हा नवीन चेहरा दिला होता. मात्र यावेळी भाजपला बहुमताचा 35 हा आकडा गाठणंही कठीण जाणार असल्याचं चित्र आहे.

भाजपच्या पराभवाची कारणं -

हिमाचलमध्ये ठाकूर वर्गातील बहुतेक लोकांचा गेल्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा होता. यंदा मात्र या वर्गातील लोकांनीही भाजपऐवजी काँग्रेस उमेदवारांना अधिक पसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकूर यांचे वर्चस्व असलेल्या भागातून यंदा भाजपला गेल्या वेळीच्या तुलनेत 5 जागा कमी मिळत आहेत. तर काँग्रेसच्या 4 जागा वाढल्या आहेत.

दलित वर्गातील लोकांनीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपला कमी पसंती दिल्याचं दिसतं. इथेही आधीच्या तुलनेत आता भाजपच्या ३ जागा कमी झाल्या आहेत. तर काँग्रेसच्या ३ जागा वाढल्या आहेत.

Himachal Election Results 2022: हिमाचलमध्ये अपक्षांची भूमिका महत्त्वाची; काँग्रेसला बहुमत मिळालं तरी भाजप आकड्यांचा गेम करणार?

हिमाचल प्रदेशात सध्या भाजपचं सरकार आहे. हिमाचलमध्ये 1985 नंतर दर पाच वर्षांनी सत्ता बदलते, असा इतिहास आहे. त्यामुळे प्रथेनुसार यावेळीही इथल्या लोकांनी सरकार बदलण्यासच पसंती दिल्याचं दिसत आहे.

2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचं झाले तर एकूण 68 विधानसभा जागांपैकी भाजपने 44 जागा जिंकल्या होत्या. तर 21 जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. CPI-M ने एक जागा जिंकली होती आणि दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होते. यावेळी मात्र चित्र अगदी उलटं आहे.

First published:

Tags: BJP, Himachal pradesh, Rahul gandhi