नीलेश राणा (बनासकांठा), 13 मे : देशभरात सर्वच भागात लग्नासराईची धामधूम सुरू आहे. दरम्यान या लग्न सराईत गुजरातमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या राज्यातील एका समाजाने विवाह सोहळे साधेपणाने पार पाडण्याच्या उद्देशाने डीजेच्या आवाजावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर दुसरी बाब म्हणजे दाढी वाढवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. या समाजातील तरुणांनी दाढीची फॅशन केल्यास तर त्यांना मोठा दंड भरावा लागेल असा थेट आदेश काढण्यात आला आहे.
अंजना चौधरी या समाजाने हा आदेश जारी केला आहे. या समाजाने सामाजिक सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून घाणेरा तालुक्यातील 54 गावांमध्ये हे आदेश जारी केले. नुकतेच, 54 गावांमधून या समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले आणि 22 कलमी कार्यक्रम ‘सामाजिक सुधारणा अंतर्गत’ समितीने हा आदेश लागू करण्यात आला.
लग्नामुळे दमून झोपलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात घातलं विषारी औषध अन् घडलं भयानकया सुधारणांनुसार समाजातील कोणी या आदेशांचे पालन केले नाही तर त्यांच्याकडून भरीव दंड वसूल केला जाणार आहे. याचबरोबर समाजातील तरुणांनी दाढी वाढवली तर त्यांना 51 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.
बैठकीदरम्यान शिकारपुरा येथील गादिपती दयाराम महाराज म्हणाले की, हिंदू धर्मात फक्त संत आणि सावन यांनाच दाढी वाढवण्याची परवानगी आहे. आपल्या समाजातील तरुण लांब दाढी करून फिरताना दिसतात हे अजिबात चांगले नाही. या तरुणांनी दाढीबाबत काळजी घ्यावी असे दयाराम महाराज म्हणाले.
समाजाने घेतलेल्या इतर निर्णयांपैकी, एखाद्याच्या घरात मृत्यू झाल्यानंतर 12 दिवसांनी चैनीच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय पार्ट्यांमध्ये जेवण बनवण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी केटरर्स, लग्नसमारंभात डीजे, हॉटेल्स आणि लग्नसोहळ्यांमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी महागडे निमंत्रण पत्रिका छापणे यासारख्या प्रकरणांवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.