जाहिरात
मराठी बातम्या / देश / लग्नामुळे दमून झोपलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात घातलं विषारी औषध अन् घडलं भयानक

लग्नामुळे दमून झोपलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात घातलं विषारी औषध अन् घडलं भयानक

लग्नामुळे दमून झोपलेल्या कुटुंबियांच्या डोळ्यात घातलं विषारी औषध अन् घडलं भयानक

छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील भिलाई खुर्द गावात चोरीची घटना उघडकीस आली आहे

  • -MIN READ Local18 Chhattisgarh
  • Last Updated :

अनूप पासवान (कोरबा), 13 मे : छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील भिलाई खुर्द गावात चोरीची घटना उघडकीस आली आहे. संजय पटेल नावाच्या व्यक्तीच्या घरात अज्ञातांनी चोरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये मोबाईल, दागिने, रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. घरात लग्नसमारंभ सुरू झाल्याने संपूर्ण कुटुंब थकून झोपले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी गुंगीचे औषध शिंपडून चोरी केली. सकाळी उठल्यावर चोरीची झाल्याचे घरच्यांना समजले, त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.

जाहिरात

छत्तीसगडच्या भिलाई खुर्द गावात संजय पटेल नावाच्या व्यक्तीच्या घरी लग्नासारख्या मोठ्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. यामध्ये चार अज्ञातांनी घरातील अनेक वस्तुंची चोरी केल्याची घटना घडली. लग्न समारंभ झाल्याने घरातील सर्वांनाच थकवा आल्याने संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार सकाळी उठल्यानंतर घरच्यांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पायाला काहीतरी चावल्याचं सांगून आईला खोलीत नेलं अन् पोटच्या मुलानेच रात्रभर केला अत्याचार, जालना हादरलं

घरातील सदस्यांच्या माहितीनुसार, त्यांच्या घरी 7 मेपासून विवाह सोहळा सुरू झाला. काल रात्रीच नवीन सून घरी आली होती. कपाटाचे कुलूप तोडून चोरट्याने चार मोबाईल, चांदीचे पैंजन व इतर दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. एकूण एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. झोपेत हात साफ करताना घातलेले दागिनेही चोरट्यांनी काढून घेतले.

जाहिरात

सकाळी घरातील उठले त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात जळजळ आणि डोकेदुखी होत होती. दरम्यान घरातील सगळ्यांच्या डोळ्यात औषध फवारून ही घटना घडवून आणल्याची शक्यता आहे.  

खोलीत उग्र वास, गडद अंधार अन् वर्षभर तिथेच बंद राहिल्या 2 बहिणी; अवस्था पाहून पोलीसही हादरले

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घरातील सगळ्याच गोष्टींची माहिती असलेल्या व्यक्तीनेच ही घटना घडवून आणली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात