जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पायाला काहीतरी चावल्याचं सांगून आईला खोलीत नेलं अन् पोटच्या मुलानेच रात्रभर केला अत्याचार, जालना हादरलं

पायाला काहीतरी चावल्याचं सांगून आईला खोलीत नेलं अन् पोटच्या मुलानेच रात्रभर केला अत्याचार, जालना हादरलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मध्यरात्री पायाला काहीतरी चावलं असल्याचं सांगत आईला उठवलं आणि घरात बोलावून घेतलं. यानंतर त्याने जे काही केलं ते संतापजनक आहे.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

रवी जैस्वाल, जालना 11 मे : आई आणि मुलाचं नातं अतिशय खास असतं. आपल्या मुलावर एखादं संकट आलं तर आई स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवतानाही मागे-पुढे पाहात नाही. तर, मुलंही आपल्या आईवर जीवापाड प्रेम करतात. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी अशीच एक घटना आता जालन्यातून समोर आली आहे. ज्याबद्दल जाणूनच तुम्हाला धक्का बसेल. एका मुलानेच जन्मदात्या वृद्ध आईला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या एका गावात घडली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळं जिल्हा हादरुन गेला आहे. जालना तालुक्यातील एक 55 वर्षीय वृद्ध महिला आपल्या अपंग पतीसोबत राहते. त्यांना एक 27 वर्षीय मुलगा आहे. मुलगा हा बाहेर जिल्ह्यात एक शेतकऱ्याकडे सालदार म्हणून काम करतो. मात्र बऱ्याच दिवसांनंतर तो घरी आला होता. खोलीत उग्र वास, गडद अंधार अन् वर्षभर तिथेच बंद राहिल्या 2 बहिणी; अवस्था पाहून पोलीसही हादरले मुलाचे वडील त्या दिवशी बाहेर गावी मुक्कामी होते. त्यामुळं आई घराबाहेर अंगणात झोपली होती. तर मुलगा घरात झोपला होता. मात्र त्याने मध्यरात्री पायाला काहीतरी चावलं असल्याचं सांगत आईला उठवलं आणि घरात बोलावून घेतलं. यानंतर त्याने जे काही केलं ते संतापजनक आहे. मुलाने आधी आईला लाकडाच्या दांडक्याने मारहाण करत केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने आईवर अत्याचारही केले. एकाच रात्रीत तीन ते चार वेळा मुलाने आईवर अत्याचार केले. दरम्यान ही सर्व हकीकत वृद्ध महिलेनं तिच्या बहिणीला सांगितल्यानंतर तिने तिला दवाखान्यात नेलं आणि मोजपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या त्या नराधमाला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Jalna , mother
  • First Published :
जाहिरात
जाहिरात