नवी दिल्ली, 1 डिसेंबर: आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला (Heavy rains and cyclone expected in various states of India predicts IMD) असून जोवाड चक्रीवादळ तयार होत असल्याचा इशारा केंद्रीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची (Heavy rains expected) शक्यता असून समुद्र उधाणलेला असणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढचे काही दिवस समुद्रकिनारी हाय अलर्ट जारी करण्यात आला (High alert at beaches) असून नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहावं, असा इशारा देण्यात आला आहे.
जाणवणार वादळाचा प्रभाव
भारताच्या पश्चिम आणि मध्य भागाला या वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. गुरुवारी दिवसभर त्यामुळे पाऊस पडण्याचा इशारा आंध्रप्रदेश आणि ओडिशा राज्यांना देण्यात आला आहे. अरबी समुद्रात सध्या तयार होत असलेलं चक्रीवादळ चार तारखेनंतर सक्रीय होऊन आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या राज्यांच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातला इशारा
महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये जोरदार वारे आणि पाऊस यांचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढणार असल्यामुळे लाटांची उंची वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार असून काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळले, असा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला असून पाळीव जनावरांना सखल भागातून हलवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मासेमारांना इशारा
मासेमारांनी पुढील 48 तास समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी कापणी केलेली पीकं सुरक्षित स्थळी नेऊन ठेवावीत, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
हे वाचा - शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या; हल्लेखोरांनी गळा चिरून पळवलं मुंडकं
थंडी वाढणार
जम्मू काश्मीरमध्ये डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कडाक्याची थंडी पडायला सुरुवात होते. मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अगोदरच थंडीला सुरुवात झाली आहे. पंजाब, राजस्थान आणि हरयाणा या राज्यात स्थिती सामान्य असली तरी तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.