तुम्हीही तुमच्या मर्जीने डाएट करता का? मग 'हे' वाचाच

तुम्हीही तुमच्या मर्जीने डाएट करता का? मग 'हे' वाचाच

वारंवार आपला आहार (diet) बदलल्यानं आरोग्य बिघडू शकतं, असं शास्त्रज्ञांना दिसून आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे, यासाठी आपल्या मर्जीनं आहारात बदल (changes in diet) करणारे अनेक जण आहेत. तुम्हीदेखील असंच करत असाल तर सावध व्हा. कारण वारंवार आहारात बदल केल्यानं आरोग्याला नुकसान पोहोचू शकतं, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

प्रतिबंधित आहार घेणारे लोकं अचानक रिच डाएट घेऊ लागले तर त्यांचं आयुष्य कमी होऊ शकतं आणि त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. ब्रिटनच्या शेफिल्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.

संशोधकांनी फ्रूट फ्लाइज (Fruit Flies) किंवा ड्रोसोफिलिया मेलानोगास्टर प्रजातीच्या माश्यांवर अभ्यास केला. सुरुवातीला माश्यांना नियमित खाण्यापेक्षा वेगळं खाणं देण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुन्हा नियमित खाणं देण्यात आलं.  संशोधकांनी दिसून आलं की, नियमित रिच डाएट घेणाऱ्या माश्यांच्या तुलनेत प्रतिबंधित आहारावरून रिच डाएट दिला गेलेल्या माश्यांची मृत्यूची शक्यता वाढली आणि त्यांनी अंडीही कमी दिली.

हे वाचा - कोरोना रुग्णानं उपवास करणं योग्य आहे की नाही?

या संशोधनाचे अभ्यासक अँड्रयु मॅक्रेकेन म्हणाले की, वारंवार आहार बदलणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. शिवाय काही परिस्थितीत प्रतिबंधित आहार व्यक्तीला विशेष प्रकारची हानी पोहोचण्याचं मूळ कारणही असू शकतं.

माय उपचारचे डॉ. लक्ष्मीदत्ता शुक्ला यांनी सांगितलं की, जेवण करणं सोपं आहे, छोट्या छोट्या चुकांमुळेही अनेक समस्या उद्भवबू शकतात. अनेक खाद्यपदार्थ असे आहेत, जे एका विशिष्ट वेळेत खाल्ल्यानेच फायदा होतो. डाएटिंग आपल्या मर्जीनं करू नका. याचा परिणाम ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरवर परू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घ्या. जीवनशैली आणि शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करू नये, याचे फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होईल.

हे वाचा - इम्युनिटी ते ब्युटीसाठी फायदेशीर आहे Vitamin C

First published: May 13, 2020, 11:09 PM IST

ताज्या बातम्या