मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /गेल्या 24 तासांत कोरोनाचा देशात हाहाकार, असे आहेत आताचे अपडेट

गेल्या 24 तासांत कोरोनाचा देशात हाहाकार, असे आहेत आताचे अपडेट

गेल्या 24 तासांमध्ये 11502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 11502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 11502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 15 जून : देशात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची 332,424 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 11502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 169798 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 9520 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 51.07 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. अशात आता अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत हा तिसरा देश आहे जिथे दररोज दहा हजारहून अधिक कोरोनाची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे 12 हजार रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवर, नजर टाकली तर या महिन्यात भारतात सुमारे दहा हजार प्रकरणं समोर आली आहेत. तर अमेरिकेत ही संख्या 22,322 आणि ब्राझीलमध्ये 25800 होती. दिवसेंदिवस नवीन प्रकरणांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंताही वाढली आहे.

न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी ही अमेरिकेतील अशी शहरं आहेत जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात कोट्यवधी प्रकरणं इथे नोंदवली गेली आहेत. न्यूयॉर्कच्या, न्यूजर्सीमध्ये 30,874 लोकांना कोरोना झाला तर 12,696, लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दोन महिन्यांत परिस्थिती इतकी बिकट झाली होती की रुग्णालयात जागाच नव्हती, लोकांच्या घरातदेखील उपचार केले जात होते.

दिल्ली-मुंबईमध्ये रुग्ण बरी होण्याची संख्या जास्त

मिळालेल्या माहितीनुसार, वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत एक दिलासादायक बातमी म्हणजे, कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्यादेखील वाढत आहे. जगातील बऱ्याच शहरांमध्ये दिल्ली-मुंबईतील रिकव्हरीचं प्रमाण अजूनही सर्वात जास्त आहे. न्यूयॉर्कमध्ये केवळ 21.23 टक्के, तर न्यूजर्सीमध्ये केवळ 18.88 टक्के साथीच्या आजारातून बरे झाले आहेत. इतकंच नाही तर तिथले लोक कित्येक महिन्यांपासून या आजाराने ग्रस्त आहेत. त्याचवेळी मुंबईत 45.65 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली तर दिल्लीत 38.36 टक्के लोकांचं आरोग्य चांगलं आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published:
top videos

    Tags: Corona