मराठी बातम्या /बातम्या /देश /15 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणं बलात्कार? High Court चा मोठा निर्णय

15 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणं बलात्कार? High Court चा मोठा निर्णय

15 वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीशी (More than 15 years Old wife)  शारीरिक संबंध ठेवणं (having sex with wife), लैंगिक अत्याचारात (Sexual Abuse) मोडतं का? याबाबत उच्च न्यायालयानं (High Court) मोठा निर्णय दिला आहे.

इलाहाबाद, 06 ऑगस्ट: 15 वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीशी (More than 15 years Old wife)  शारीरिक संबंध ठेवणं (having sex with wife), लैंगिक अत्याचारात (Sexual Abuse) मोडतं का? याबाबत इलाहाबाद उच्च न्यायालयानं (Allahabad High Court) मोठा निर्णय दिला आहे. हुड्यासाठी छळ आणि अनैसर्गिक शारीरिक संबंधाप्रकरणी सुनावणी करताना इलाहाबाद न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयानं सुधारीत कलम 375 चा आधार घेतला आहे. या कलमान्वये 15 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणं, लैंगिक अत्याचारात मोडत नसल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी न्यायालयानं हुंड्यासाठी छळ आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध असे  आरोप असणाऱ्या पतीला जामीन मंजूर केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

8 सप्टेंबर 2020 रोजी खुशाबे अलीविरुद्ध त्याच्या पत्नीनं मुरादाबादच्या भोजपूर पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती मो. असलम यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

हेही वाचा- POCSO Court: मुलीचा हात पकडणं म्हणजे लैंगिक अत्याचार नाही, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय

यावेळी याचिकाकर्त्याचे वकील केशरीनाथ त्रिपाठी म्हणाले की, आयपीसीच्या कलम 375 मध्ये 2013 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार, 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणं बलात्काराच्या श्रेणीत बसत नाही.

हेही वाचा-बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची शेतकरी महिलेकडून हत्या; कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

सुनावणीनंतर न्यायालयानं म्हटलं की, कलम 375 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारित कलमाच्या उप-कलम 2 नुसार, जर पत्नीचं वय 15 वर्षांपेक्षा कमी नसेल, तर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणं म्हणजे बलात्कार ठरणार नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याला जामीन मंजूर करताना विविध अटींसह त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

First published:
top videos

    Tags: High Court