मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची शेतकरी महिलेकडून हत्या; कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची शेतकरी महिलेकडून हत्या; कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

कोर्टाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून सध्या याची चर्चा होत आहे.

कोर्टाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून सध्या याची चर्चा होत आहे.

कोर्टाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून सध्या याची चर्चा होत आहे.

चेन्नई, 16 जुलै: तमिळनाडूमधील 21 वर्षांच्या एका तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी नराधमाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, स्वत:चा बचाव करण्यासाठी तिने आरोपीवर दगडाने हल्ला केला. यादरम्यान 40 वर्षीय आरोपीचा मृत्यू झाला. ही घटना तिरुवल्लूरमधील मिंजूर भागात घडली आहे. पोलिसांनी महिलेविरोधात आयपीसी कलम 100 अंतर्गत (आत्मरक्षाचा अधिकार) गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तिची सुटका करण्यात आली. या प्रकरणात मिंजूर पोलिसांना एक माशांच्या फार्मजवळ आरोपीचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत संशयास्पद मृत्यू दाखल केला होता. (farmer woman raped who attempted rape, court gave an important verdict)

देशात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा महिला विरोध करू शकत नाही, असं समजून गैरफायदा घेत पुरुष त्यांच्यावर अन्याय करीत राहतात. या प्रकरणात महिलेने स्वत:वर होत असलेल्या अत्याचाराचा प्रतिकार केला.

महिलेला आहेत दोन मुलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला दोन मुलं आहेत. ती शेतात काम करीत होती. त्यावेळी एक व्यक्ती आत शिरला. त्याने तिला खेचत एका निर्जन ठिकाणी आणलं आणि येथे तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेचं म्हणणं आहे की, बलात्कारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आरोपीला तिने धक्का दिला. त्यानंतर एका दगडाने त्याच्यावर हल्ला केला. महिलेने त्याला शेताबाहेर खेचलं आणि रस्त्यावर फेकून दिलं.

हे ही वाचा-मुलींना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेट महिला एजंटला अटक

महिलेने पतीला सांगितला सर्व प्रकार

घटनेनंतर महिलेने आपल्या 26 वर्षीय पतीला सर्व हकीकत सांगितली. महिलेचा पती जवळच्या शेतात काम करीत होता. त्यानंतर अन्य वर्करही तेथे पोहोचले. काही वेळानंतर स्थानिक लोकही तेथे पोहोचले.

स्थानिकांनी याबद्दल सांगितल्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावली व आरोपीला रुग्णालयात घेऊन गेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घषित केले. पोलिसांनी संशयास्पद घटना दाखल करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.

First published:

Tags: Court, Crime news, Rape, Tamil nadu