मुंबई 06 ऑक्टोबर: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचा बीकॉम अंतिम वर्षाचा आजचा पेपर मंगळवारी पुढे ढकलण्यात आला आहे. Online परीक्षा देता न आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परीक्षेच्यावेळी मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. परीक्षा देऊ न शकलेले शेकडो विद्यार्थी विद्यापीठात आले आणि त्यांनी विचारणा केली. Online परीक्षेसाठी जी तयारी करायला पाहिजे ती तयारी करण्यात आली नव्हती असा मुलांचा आरोप होता. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्प मध्ये सगळे विद्यार्थी जमले होते. तीन ऑक्टोबरपासून ही परीक्षा सुरू झाली असून पहिलाच पेपर अनेक विद्यार्थ्यांना देता आला नव्हता. आज दुसरा पेपर होता आणि हा ही पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे विद्यारर्थ्यांमध्ये नाराजी आणि चिंताही होती. कोरोनामुळे आधीच सगळं वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यात आता परीक्षाही नीट देता येत नसल्याने आपलं वर्ष तर वाया जाणार नाही ना याची काळजी विद्यार्थ्यांना आहे. तर एकाही विद्यार्थी हा परीक्षेपासून वंचित राहणार नाही आणि त्याचे वर्षही वाया जाणार नाही असं विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं आहे. Online परीक्षा घेताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या तातडीने दूरही करण्यात येत आहेत. त्यामुळेच सगळ्यांनीच सहकार्य करावी असं आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
मबंई विद्यापीठाच्या परिक्षा केंद्रात गोंधळ, दूरस्थ-मुक्त विद्यापीठ परिसरात अंतिम वर्षाच्या परिक्षांवरून गोंधळ, हेल्पलाईनच्या मुद्यासह विविध अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा संताप @MumbaiUni @Vivekjkulkarni @samant_uday #MumbaiUniversity #education pic.twitter.com/GO9N35PziO
— News18Lokmat (@News18lokmat) October 6, 2020
विद्यापीठाने दिलेले हेल्पलाईन नंबर उचलले जात नाहीत अशीही तक्रार विद्यार्थ्यांची होती. या मुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. वाहतुकीची व्यवस्था नाही. कोरोनाची भीती अशा वातावरणात कशी परीक्षा द्यायची असा सवालही त्यांनी केला आहे.