मराठी बातम्या /बातम्या /देश /कोर्टात झालेल्या स्फोटानंतर खळबळ, परिसर केला रिकामी; दोन जण जखमी

कोर्टात झालेल्या स्फोटानंतर खळबळ, परिसर केला रिकामी; दोन जण जखमी

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी ( 2 people were slightly injured) झाल्याची माहिती समोर येत आहे.

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी ( 2 people were slightly injured) झाल्याची माहिती समोर येत आहे.

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी ( 2 people were slightly injured) झाल्याची माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली, 09 डिसेंबर: दिल्लीतील रोहिणी कोर्टात (Delhi's Rohini Court) गुरुवारी सकाळी स्फोट झाला. यानंतर कोर्टात एकच खळबळ उडाली. यानंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी ( 2 people were slightly injured) झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कोर्ट रिकामी केले असून दरवाजे बंद केलेत.

माहिती मिळताच रोहिणी जिल्ह्याचे डीसीपी आणि एसीपी आरती शर्मा पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. हा स्फोट कोणत्यातरी इलेक्ट्रॉनिक उपकरणात झाल्याचं पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे. रोहिणी कोर्ट क्रमांक 102  मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा स्फोट झाला. यानंतर लोकांनी रोहिणी कोर्टात गोळीबार झाल्याची अफवा पसरवली. घटनास्थळावरून पोलिसांना आयईडी, स्फोटक आणि टिफिनसारखी वस्तू सापडली आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल तपास करत असून NSGलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा-  महिन्याभरापासून बेपत्ता होती महिला; सापडला सांगाडा, मुलानं सांगितलं, 'पप्पांनी...'

स्पेशल सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोर्टात झालेला स्फोट क्रूड बॉम्बसारखा दिसत आहे. तो लहान IED असू शकतो. पण IED नीट बनवता आला नाही असं दिसतंय. मात्र, यासंदर्भात फॉरेन्सिक टीम योग्य माहिती देऊ शकतील. रोहिणी कोर्टाच्या बार असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितलं की, कोर्ट रूममध्ये स्फोट झाला. पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रोहिणी कोर्टात गोळीबार झाला

काही दिवसांपूर्वी रोहिणी कोर्टात गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. गँगस्टर जितेंद्र गोगी याच्यावर कोर्टात दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात तो ठार झाला होता. जितेंद्र गोगी सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाला होता. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत दोन्ही हल्लेखोरांना ठार केले. हे दोन्ही हल्लेखोर टिल्लू ताजपुरिया टोळीशी संबंधित होते आणि टिल्लूनं स्वतः तुरुंगातूनच त्यांना सूचना दिल्या होत्या.

First published:

Tags: Delhi high court