BJP कार्यालयात गायीचं कापलेलं डोकं घेऊन जाणाऱ्याला शिवसेनेनं दिली उमेदवारी!

BJP कार्यालयात गायीचं कापलेलं डोकं घेऊन जाणाऱ्याला शिवसेनेनं दिली उमेदवारी!

स्वत:ला गोरक्षक म्हणवणारे दलाल यांनी सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवाद, गाय संरक्षण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं दलाल यांनी म्हटलं होतं.

  • Share this:

बहादुरगड (हरियाणा), 09 ऑक्टोबर : जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते उमर खालिद (JNUSU Leader Omar Khalid) याच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींपैकी नवीन दलाल याचा शिवसेनेनं हरियाणा विधानसभा निवडणुकीच उमेदवारी जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांना बहादूरगड मतदारसंघातून उमेदवार केलं आहे. स्वत:ला गोरक्षक म्हणवणारे दलाल यांनी सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवाद, गाय संरक्षण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं दलाल यांनी म्हटलं होतं.

भाजपावर केले होते आरोप

29 वर्षीय दलाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'भाजपा आणि कॉंग्रेस सरकारकडे शेतकरी, हुतात्मे, गायी आणि गोरगरिबांसाठी काहीही नाही. ते फक्त राजकारण करतात. हरियाणा (दक्षिण) चे शिवसेना प्रमुख विक्रम यादव यांनी दलाल यांना पक्षाकडून तिकीट देण्याचं ठरवलं आहे. 'दलाल हे गायींचे रक्षण आणि देशविरोधी घोषणा देणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासारख्या मुद्द्यांवर काम करत आहेत, म्हणून आम्ही त्यांना निवडलं' अशी प्रतिक्रिया विक्रम यादव यांनी दिली आहे.

इतर बातम्या - छगन भुजबळांना मोठा धक्का, या NCP नेत्याने दिला शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा!

ऑगस्ट 2018 मध्ये, दलाल आणि दरवेश शाहपूर नावाच्या व्यक्तींनी उमर खालिदवर कथित हल्ला घडवून आणला होता. त्यात उमर खालिद बचावला होता. हा हल्ला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची बंदूक खराब झाल्याने खालिद फरार झाला आणि त्याने आपला जीव वाचवला. त्यानंतर दलाल आणि शाहपूरने पळ काढला परंतु एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या व्हिडिओमध्ये खालिद या दोघांवर झालेल्या हल्ल्याचं वर्णन करण्यात आलं होतं.

इतर बातम्या -  पवार कुटुंबातील तरुणांना ऑफर, भाजपमध्ये प्रवेशाचे दरवाजे खुले

खालिदवरील हल्ल्याबद्दल विचारलं असता दलाल म्हणाला की, 'सध्या मला त्याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. हे प्रकरण फक्त उमर खालिदचेच नाही तर अजून बरेच काही आहे.' शिवसेनेच्या यादव यांनी दलालांचा बचाव करत हाच देशप्रेम दाखवण्याचा त्यांचा मार्ग असल्याचं सांगितलं. उमर खालिदशी त्याचा वैयक्तिक वाद नाही. देशाच्या राजधानीत असलेल्या विद्यापीठात देशविरोधी घोषणाबाजी केल्याने तो दु:खी झाले होते असं यादव म्हणाले.

इतर बातम्या - 'इतका कडक गांजा देशात आला कुठून'; आदित्य ठाकरेंविरोधातल्या पोस्टमुळे खळबळ

दलाल यांच्याविरोधात तीन फौजदारी खटले दाखल आहेत. दलाल यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे की, त्यांच्यावर 3 फौजदारी खटले प्रलंबित आहेत. खालिद प्रकरणाशिवाय दलाल यांच्यावर बहादूरगडमधील आयपीसीच्या कलम 147/149 आणि भाजपाच्या मुख्य कार्यालयातील गायीचे छाटलेलं डोके घेऊन गेल्याप्रकरणी खटला सुरू आहे. बरं अस असताना निवडणुकीच्या पोस्टरमध्ये दलाल यांनी मात्र, गाय संरक्षणाचा मुद्दा मांडला आहे.

इतर बातम्या - आम्ही एकत्र येऊ; कारण... शरद पवार थकलेत आणि आम्ही सुद्धा!

Published by: Renuka Dhaybar
First published: October 9, 2019, 1:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading