मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Care Tips: केसांत कोंडा झालाय? मग हे घरच्या घरी केलेलं Hair Mask नक्की ट्राय करा

Hair Care Tips: केसांत कोंडा झालाय? मग हे घरच्या घरी केलेलं Hair Mask नक्की ट्राय करा

केसांत कोंडा ( Dandruff Hair ) होणे ही समस्या अगदी कॉमन आहे. घरच्या घरी केलेला हा हेअर मास्क त्यावरचा रामबाण उपाय अनेकांना वाटतो. तुम्हीही एकदा ट्राय करा.

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 29 ऑक्टोबर : Hair Care Tips केसांत कोंडा होणे, स्कॅल्प मध्ये खाज येणे ही समस्या अगदी सामान्य आहे. आणि कोंडा होणे हे केसांसाठी अजिबात चांगले नसते. यामुळे केसगळती, सतत खाज येणे, केस पातळ होणे ही समस्या बहुतेकदा दिसून येते. आणि कोंडा हा असा प्रकार आहे, आपण नुसता केसात थोडे खाजवले तरी तो कोंडा आपल्या कपड्यांवर दिसून येतो. आणि असा कोंडा कपड्यांवर दिसून येणे हे चार चौघात खुपच विचीत्र वाटते.

आपण कोंडा झाला की बरेच डॉक्टरी उपचार करतो, तर काही तरी घरगुती उपाय करून बघतो. पण बऱ्याचदा आपली यातून सुटका होत नाही. यासाठी आम्ही खास तुमच्या साठी साधे सोप्पे घरगुती Hair Mask For Dandruff आणले आहेत. हे मास्क आपण आपल्या घरात असलेल्या सहित्यांपासून तयार करणार आहोत. आणि यापासून नक्कीच तुमची सुटका होण्याची शक्यता अधिक आहे.

वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे तुमच्याही कानावर परिणाम होतोय का? ही आहेत लक्षणं, वाचा सविस्तर

हेअर मास्क साठी लागणारे साहित्य

1. 3-4 कडुलिंबाची सुकलेली पाने

2. दोन तीन चमचे आवळ्याचा रस

3. वरील सहित्याप्रमाणे मोजके पाणी

केवळ या तीन साहित्यातून हे Hair Mask कसे तयार करता येईल.

वरील सर्व सामग्री एका वाटीत मिक्स करून घ्यावी. आवळ्याच्या रसामध्ये कडुलिंबाची सुकलेली पाणी अगदी बारीक मॅश करून टाकावीत. वरून थोडे पाणी घालून हे मिश्रण तयार होईल. हे घरगुती मास्क आपल्या केसांना बाहेरून आतून नीट लावावे. शक्यता हे मास्क स्कॅल्प मध्ये नीट लावावे. असेच एक 5 ते 7 मिनिटे असेच ठेवून द्यावे. त्यानंतर केसांना गरम पाण्याने धुवावे. आठवड्यातून दोनदा असे केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

प्रदूषणापासून होणारा धोका टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच; फुफ्फुसे राहतील निरोगी

आवळा आणि कडुलिंब दोन्ही गोष्टी खूप आयुर्वेदीक असतात. यातील अँटी ऑक्सीडेंट केसांना पोषक घटके प्राप्त करून देते. सोबतच आवळा आपल्या केसांना बळकट व चमकदार आणि काळेभोर करण्यास मदत करतो. या दोन्ही घटकातील पदार्थ केसांना अधिक मजबूत ठेवतात व गळण्यापासून वाचवतात.

First published:

Tags: Daily news, Lifestyle, Personal life, Woman hair