मराठी बातम्या /बातम्या /देश /

वजन कमी करण्याच्या नावाखाली दिलं वेगळंच इंजेक्शन; जिम ट्रेनरचं तरुणीसोबत घृणास्पद कृत्य

वजन कमी करण्याच्या नावाखाली दिलं वेगळंच इंजेक्शन; जिम ट्रेनरचं तरुणीसोबत घृणास्पद कृत्य

Rape News: जिम ट्रेनरनं वजन कमी करण्याचं इंजेक्शन (Weight loss injections) देण्याच्या बहाण्यानं एका तरुणीला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन (Injection of anesthesia) देत तिच्यावर अत्याचाराच्या परिसीमा गाठल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

लुधियाना, 22 ऑगस्ट: जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं वजन कमी करण्याच्या नावाखाली एका तरुणीवर बलात्कार (Gym Trainer Raped Woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी ट्रेनरनं वजन कमी करण्याचं इंजेक्शन (Weight loss injections) देण्याच्या बहाण्यानं पीडित तरुणीला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन (Injection of anesthesia) दिलं आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडित तरुणीचे अश्लील फोटोही (Obscene Photos) काढले आहेत. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यानंतर पीडित महिलेनं लुधियाना पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

धर्मेंद्र जोशी असं आरोपी तरुणाचं नाव असून तो लुधियानातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. आरोपी जोशीनं येथील एका 40 वर्षीय पीडित महिलेला वजन कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच लवकरात लवकर सडपातळ व्हायचं असेल तर इंजेक्शन घ्यावं लागेल, असा उपायही आरोपी ट्रेनरनं पीडितेला सुचवला होता. आरोपी ट्रेनरच्या आमिषाला बळी पडत, 40 वर्षीय पीडित महिला इंजेक्शन घ्यायला तयार झाली.

हेही वाचा-धक्कादायक! तब्बल 65 तरुणींना ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, मग केला अश्लिलतेचा कहर

यानंतर आरोपी ट्रेनरनं वजन कमी करण्याचं इंजेक्शन असल्याचं भासवत महिलेला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन टोचलं. यामुळे पीडित महिला बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीनं घृणास्पद कृत्य करत पीडितेवर अत्याचाराच्या परिसीमा ओलांडल्या. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडितेचे अश्लील फोटोही आपल्या मोबाइलमध्ये काढले.

हेही वाचा-रक्षाबंधनच्या दिवशी बीड हादरलं, पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार

नराधम आरोपी ट्रेनर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं लुधियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Panjab, Rape