• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • धक्कादायक! तब्बल 65 तरुणींना ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, मग केला अश्लिलतेचा कहर

धक्कादायक! तब्बल 65 तरुणींना ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, मग केला अश्लिलतेचा कहर

बनावट फेसबुक आयडीच्या (Fake Facebook id) मदतीनं 65 तरुणींना (65 girls) प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लिल व्हिडिओ (porn videos) तयार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.

 • Share this:
  कानपूर, 22 ऑगस्ट : बनावट फेसबुक आयडीच्या (Fake Facebook id) मदतीनं 65 तरुणींना (65 girls) प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लिल व्हिडिओ (porn videos) तयार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. तो फेसबुकवर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि त्यानंतर त्यांच्यासोबत शारीरिक संबंध (Physical relations) प्रस्थापित करून त्याचं व्हिडिओ शूटिंग (video shooting) करायचा. त्यानंतर हे शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणींना ब्लॅकमेल करायचा. असा उघड झाला गुन्हा उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीनं अंकूर नावाच्या तरुणाविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आपल्याशी फेसबुकवरून मैत्री करून प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर शारीरिक संबंधांचं व्हिडिओ शूटिंग करून हा तरुण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार या तरुणीनं केली आहे. या प्रकाराची कल्पना आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना आल्यामुळे आपण तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेखर नावाच्या आरोपीला अटक केली. शेखर हा 28 वर्षांचा असून तो शाहजहांपूरचा रहिवासी आहे. धक्कादायक माहिती उघड शेखरच्या मोबाईलमधून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या 65 तरुणींचे अश्लिल व्हिडिओ असल्याचं दिसून आलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या साहाय्याने आरोपीने आतापर्यंत 65 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं असून त्यांचे अश्लिल व्हिडिओ तयार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यासोबत शेकडो मुलींसोबतच चॅट आणि कॉन्टॅक्ट नंबर्सही पोलिसांना मिळाले आहेत. हे वाचा - ‘ती’ गोड बोलून फसवायची, ‘तो’ व्हिडिओ बनवून FIR ची धमकी द्यायचा! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेखर हा दररोज 150 ते 200 मुलींसोबत चॅट करत असे. अंकूर गुप्ता, आयुष अग्रवाल, अंकूर उमर, नेहा अग्रवाल, सौम्या उमर अशा अनेक बनावट नावांची त्याने अकाऊंट उघडली होती. अंकूर हे त्याचं प्रत्यक्षातील टोपणनाव असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: