मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रक्षाबंधनच्या दिवशी बीड हादरलं, पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार

रक्षाबंधनच्या दिवशी बीड हादरलं, पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार

या नराधमाने पीडितेला सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार केले होते.

या नराधमाने पीडितेला सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार केले होते.

या नराधमाने पीडितेला सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार केले होते.

बीड, 22 ऑगस्ट : भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन (raksha bandhan) सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचं वचन आपल्या लाडक्या बहिणींना देत आहे. पण, असं असलं तरी विकृत लोकांमुळे आजच्या दिवसाला गालबोट लागत आहे. बीडमध्ये (beed) पुन्हा एकदा बलात्काराचे (rape) प्रकरण समोर आले आहे. एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यात दररोज महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आज पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या शिंगारवाडी येथे उघडकीस आली आहे.

पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा ब्रेक; आज याठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी

चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शिंगारवाडी येथील 28 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. गावातीलच नात्यात असलेल्या विक्रम काळे याने हे कृत्य केलं आहे. या नराधमाने पीडितेला सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार केले होते. तसंच शेतामध्ये काम करत असतानाजवळ कोणी नसल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

सतत धमकी देऊन हा नराधम अत्याचार करत होता, त्यामुळे पीडितेनं महिलेने चकलांबा पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी विक्रम काळे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

धक्कादायक म्हणजे, मागील ३ दिवसातली ही दुसरी घटना आहे. पैशाचे आमिष दाखवून एका 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपीला अटक केली आहे.

Indian Air Force Recruitment: ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती

विक्रम भगवान पवार असं आरोपीचं नाव असून आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला मक्याच्या शेतात नेऊन अत्याचार केला. या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्या हेमा पिंपळे यांनी आरोपीला चप्पलने मारहाणीचा प्रयत्न केला. या घटनेनं संताप व्यक्त केला जात असून नराधम आरोपीला कठोर शिक्षा करा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

First published:

Tags: Raksha bandhan, Rape case