लॉकडाऊनमुळे कॅनडाचा व्हिसा झाला रद्द, बंदूक घेऊन मंदिरात गेला अन् गाभाऱ्यातच...

यावर्षी त्याला कॅनडा जाण्याची इच्छा होती मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्याचा व्हिसा रद्द झाला.

यावर्षी त्याला कॅनडा जाण्याची इच्छा होती मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्याचा व्हिसा रद्द झाला.

  • Share this:
    लखनऊ, 07 नोव्हेंबर : कोरोनामुळे सध्या लोकांमध्ये प्रचंड मानसिक तणाव आहे. एकीकडे कोरोना होईल या भीतीनं लोकं हैराण आहेत तर दुसरीकडे नोकरी नसल्यामुळे चाकारमानी चिंतेत आहे. लखनऊमध्येही असेच घडले जेव्हा लॉकडाऊनमुळे एका सॉफ्टवेअर इंजिनिअर कॅनडाला जाऊ शकला नाही आणि यामुळे तणावत येऊन त्यानं मंदिरात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि लखनऊमध्ये तो कामानिमित्त राहत होता. लखनऊमधील एका खासगी कंपनीत काम करत होता. शुक्रवारी उशिरा संध्याकाळी त्यानं मंदिरात गोळी झाडून आत्महत्या केली. शेजार्‍यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. वाचा-Nude Photo काढून ब्लॅकमेल करणाऱ्या गँगचा पर्दाफाश; डॉक्टरांकडूनही पैशांची मागणी डीसीपी सोमण वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक राहुल बलियाचा रहिवासी होता आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. यावर्षी त्याला कॅनडा जाण्याची इच्छा होती मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्याचा व्हिसा रद्द झाला. मृत व्यक्ती सध्या लखनऊ येथे राहणार्‍या एका खासगी कंपनीत कामाला होता. यावेळी तो नैराश्यात होता. वाचा-पती आणि मुलासह सेल्फी घेताना महिलेचा पाय घसरला; 1000 फूट दरीत सापडला मृतदेह पोलिसांनी केलेल्या तपासात राहुलच्या खोलीतून त्यांना एनर्जी ड्रिंक आणि काही औषधं मिळाली आहेत. पोलिसांनी घरातील सदस्यांना माहिती दिली आहे, पुढील कारवाई केली जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published: