Home /News /national /

MP By Election Result 2020: जास्तीत जास्त 32 राउंडमध्ये होणार मतमोजणी, प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा

MP By Election Result 2020: जास्तीत जास्त 32 राउंडमध्ये होणार मतमोजणी, प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा

Madhya Pradesh Assembly by-election 2020: मतमोजणीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने तीन स्तरिय सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त केला आहे.

    ग्वालियार, 10 नोव्हेंबर: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh Assembly by-election)  पोटनिवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे, तर साधारण 9 वाजल्यांपासून विविध जागांबाबतचा अंदाज समोर येण्यास सुरुवात होईल. यादरम्यान ग्वालियार जिल्ह्याच्या (Gwalior District) तीन विधानसभा जागांसाठी देखील 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. आजच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस प्रशासन देखील सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज आहे. वाहतुक व्यवस्थेच्या दृष्टीने देखील योग्य खबरदारी घेतली जात आहे. अलेश्वर रोड आणि थीम रोड (Aleeshwar Road And Theme Road) वर वाहतूक बंद राहणार आहेत. मतमोजणीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने तीन स्तरिय सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त केला आहे. याअंतर्गत  CRPF, SAF आणि पोलिसांचे जवळपास 600 जवान आणि अधिकारी सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत. (हे वाचा-Bypoll 2020 :मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारचा आज फैसला, थोड्याच वेळात मतमोजणी) निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 10 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ग्वालियार जिल्ह्यातील तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या मतांची मोजणी होत आहे. प्रथम टपाल मतपत्रिका आणि सेवा मतदारांनी पाठविलेल्या मतमोजणीस प्रारंभ होईल. अर्ध्या तासानंतर ईव्हीएम मतांची मोजणी सुरू केली जाईल. भारतीय निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या यंत्रणेनुसार प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक मोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक आणि मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त केले जातील. अशा प्रकारे एका टेबलावर तीन अधिकारी तैनात केले जातील. मोबाइल नेण्याची परवानगी नाही मिळालेल्या माहितीनुसार, ग्वालियार पूर्वमध्ये 32, ग्वालियार विधानसभामध्ये 30 आणि डवरामध्ये 24 राउंडमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट आणि 8.30 वाजता EVM मतांची मोजणी केली जाणार आहे. याठिकाणी कडेकोड बंदबोस्त आहे. कोणत्याही मतमोजणी कक्षात ऑब्झर्व्हर व्यतिरिक्त कुणालाही मोबाइल घेऊन जाण्याची परवानगी नाही आहे. मध्यप्रदेशात 28 जागांसाठी पोट निवडणूक मध्य प्रदेशात 28 जागांसाठी पोट निवडणूक झाली आहे. त्यामुळे भाजपच्या शिवराज सिंह चौहान सरकारसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या मतमोजणीवर शिवराज सरकार अवलंबून आहे. यामध्ये 9 जागांवर जिंकणं भाजपला आवश्यक आहे. 230 सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेमध्ये भाजपचे 105 आमदार आहेत, तर सरकार स्थापण्यासाठी 116 आमदारांची आवश्यकता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Election, Madhya pradesh

    पुढील बातम्या