Home /News /national /

कोलांटी उडी मारली आणि 20 वर्षीय तरुण पोहोचला lock-up मध्ये, IPS अधिकारी म्हणाला..

कोलांटी उडी मारली आणि 20 वर्षीय तरुण पोहोचला lock-up मध्ये, IPS अधिकारी म्हणाला..

गाझियाबादमध्ये महाविद्यालयीन तरुणींसमोर एक तरुण कोलांटी उडी मारत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी विचारलं की, यूपीचं अँटी रोमियो पथक कुठे आहे? यानंतर पोलिसांनी कारवाई करत कोलांटी मारणाऱ्या या 20 वर्षीय तरुणाला अटक केली.तो बुलंदशहरमधील दिबई येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं.

पुढे वाचा ...
    गाझियाबाद, 10 मे : सोशल मीडियाची (Social Media) कमाल म्हणजे, इथे माणूस रातोरात लोकप्रिय होतो. अलीकडेच, सलमान खानचा डुप्लिकेट रील बनवण्यासाठी रस्त्यावरून शर्टलेस जात असताना लॉकअपमध्ये पोहोचला. मात्र, त्याला जामीन मिळाला आहे. असाच आणथी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे महाविद्यालयीन तरुणींसमोर एक तरुण कोलांटी उडी मारत होता. पण जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला तेव्हा काही जणांनी विचारलं की, यूपीचं अँटी रोमिओ स्क्वॉड कुठे आहे? त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कोलांटीची मारणाऱ्या मुलाला अटक (arrest) केली. आयपीएसनी विचारलं याचा गुन्हा काय आहे? हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. अनेकांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केलंय. तर, काहींनी प्रश्न उपस्थित केला की, लोकांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या स्टंटसाठी इंस्टाग्राम रील बनवून अटक करणं कितपत योग्य आहे? तर, एका आयपीएस अधिकाऱ्यानं अटक का केली? गुन्हा काय आहे? असा प्रश्न केला आहे. तसं पाहिलं तर, काही लोकांनी या तरुणाच्या स्किलचं कौतुक केलं आहे. या तरुणाचा फिटनेस आणि अॅक्शनवरील कंट्रोलही चांगलं असल्याचं लोकांनी म्हटलंय. अशा तरुणातील ऊर्जा ओळखून त्याला संबंधित क्रीडा प्रकारांसाठी प्रोत्साहित केलं जावं असंही काहींचं म्हणणं आहेय भाजप नेते डॉ. शलभमणी त्रिपाठी (@shalabhmani) यांनी 8 मे रोजी ही व्हिडिओ क्लिप ट्विट केली आणि लिहिलं, 'जेव्हा पालकांनी शाळेत पाठवलं तेव्हा हे महाराज शाहरुख खानचे फॅन झाले. गर्ल्स कॉलेजसमोर हिरो बनून स्टंटबाजी करू लागलेत. पण योगीराज आता यूपीत आहेत हे विसरले. सध्या लॉकअपमध्ये आहेत. तेथे त्यांना नैतिक शिक्षणाची पुरेशी पुस्तकंही दिली जात आहेत.' रिपोर्टनुसार, ही क्लिप गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिस स्टेशन भागातील आहे. सुशीला इंटर कॉलेजजवळ ही क्लिप शूट केल्याचं सांगण्यात आलं. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की, मुली एका ग्रुपमध्ये कॉलेजमधून बाहेर पडत असताना, एक मुलगा आधी बॅकफ्लिप मारतो. नंतर कोलांटी उडी मारत जातो. क्लिपमध्ये इंस्टा रीलप्रमाणे पार्श्वसंगीत देखील आहे. हे वाचा - 'झोपाळू' गावामुळे संशोधकही अचंबित; येथे चालता-चालता झोपतात लोक; कारण... 20 वर्षीय तरुणाला अटक या प्रकरणी, गाझियाबाद पोलिसांनी ट्विट केलंय की, त्यांनी तातडीने दखल घेत तरुणाला अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल म्हणाले, 'व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा बुलंदशहरमधील दिबईचा रहिवासी आहे. सशीला गर्ल्स कॉलेजसमोर हा तरुण मुलींसमोर कोलांटी उडी मारताना व्हिडिओत दिसत होता. युवकाचं नाव दुष्यंत कुमार आहे. तो 20 वर्षांचा आहे. सध्या हा तरुण गौतम बुद्ध नगर पोलीस ठाण्याच्या बादलपूर परिसरात राहतो.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Police arrest, UP, Viral video.

    पुढील बातम्या