गांधीनगर, 13 सप्टेंबर: विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे नवीन मुख्यमंत्री (Gujarat New CM) म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची वर्णी लागली आहे. आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी गुजरातला नवी मुख्यमंत्री मिळणार असून राज्यात ‘भूपेंद्र’ पर्वाला सुरुवात होणार आहे. या शपथविधी कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री आणि बडे नेते हजरी लावणार आहेत. यामध्ये गृहमंत्री अमित शाहांपासून (Amit Shah) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानही (CM Shivraj singh Chauhan) हजेरी लावणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता अमित शाह अहमदाबाद येथे पोहोचणार आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, गुजरातचा मुख्यमंत्री कोण होणार ? असा प्रश्न अनेकांना पडला होतात. गुजरातचा नवीन मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल, मनसुख मांडवीय आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. पण भाजपनं अनेक राजकीय पंडितांना धक्का देत गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची कमान भूपेंद्र पटेल यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रुपाणी यांचा राजीनामा भाजपची मोठी खेळी समजली जात आहे. हेही वाचा- देशभरात लोकअदालतीतून एका दिवसात 33 लाखांहून अधिक प्रकरणांची झाली सुनावणी रविवारी भाजप कार्यकारणीची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. याच बैठकीत गुजरातचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक मोठंमोठ्या नेत्यांची नावं चर्चेत होती. पण भाजपनं एका नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. पाटीदार समाजातून येणाऱ्या भूपेंद्र पटेल यांच्याकडे भाजपनं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे आजपासून गुजरातमध्ये ‘भूपेंद्र पर्व’ला सुरुवात होणार आहे. आज दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी आज भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हेही वाचा- अखेर ‘लंबी जुदाई’ संपली, पाकिस्तानात अडकलेल्या नववधूचा 3 वर्षांनी गृहप्रवेश भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोडिया मतदासंघातून 2017 ची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत वासुदेवभाई पटेल यांचा दारूण पराभव केला होता. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुजरातमध्ये 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे असं मानलं जात आहे की, भाजपला विजय रुपाणींवर यांच्यावर डाव लावायचा नाही. कोरोना काळात गुजरात सरकारचे अपयश हे देखील राजीनाम्याचं प्रमुख कारण मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.