जैसलमेर, 12 सप्टेंबर : भारतातील (Indian) तरुणाशी लग्न (Marriage) होऊनही 3 वर्ष (3 years) पाकिस्तानमध्ये (Pakistan) अडकून पडलेल्या वधूची (Wife) प्रतीक्षा अखेर संपली असून तिने भारतातील आपल्या सासरी प्रवेश केला आहे. पाकिस्तानात लग्न झाल्यानंतर या तरुणीची पती भारतात आला, मात्र ही महिला पाकिस्तानमध्येच अडकली होती. तिला काही तांत्रिक कारणासाठी देश सोडता येत नव्हता. मात्र अखेर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत ती राजस्थानातील आपल्या घरात पोहोचली आहे. तीन वर्षांपूर्वी झालं लग्न राजस्थानच्या जैसलमेरमध्ये राहणारे विक्रम सिंह यांचं लग्न पाकिस्तानातील निर्मलासोबत झालं होतं. या लग्नासाठी विक्रम सिंह पाकिस्तानात गेले होते आणि लग्न करून परत आले होते. लग्नानंतर काही दिवसांतच औपचारिकता पूर्ण करून निर्मलादेखील जैसलमेरला येणार होती. मात्र त्यांचा व्हिसाच ब्लॅकलिस्ट करण्यात आला. त्यामुळे निर्मलाला भारतात येणं शक्य होत नव्हतं. पुलवामा हल्ल्यानंतर परिस्थिती बिकट भारत आणि पाकिस्तानमध्ये सौहार्दाचं नातंही असल्यामुळे अनेक नागरिक भारतात येत असतात. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून थार एक्सप्रेसही बंद ठेवण्यात आली आहे. या एक्सप्रेसने अनेक नागरिक पाकिस्तानातून भारतात यायचे आणि परतही जायचे. मात्र ही एक्सप्रेसच बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास रखडला. त्यात निर्मला यांचाही समावेश होता. त्यामुळे लग्न होऊनदेखील त्यांना पतीकडे येता येत नव्हतं. असा सुटला तिढा जैसलमेरचे रहिवासी असणाऱ्या विक्रम सिंह यांनी आपल्या पत्नीला भारतात आणण्यासाठी मोठा आटापिटा केला. अगदी केंद्र सरकारपर्यंत त्यांनी त्यांची फिर्याद पोहोचवली. त्यानंतर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी विक्रम यांच्या प्रश्नात लक्ष घातलं. परराष्ट्र व्यवहार खात्याशी संपर्क साधत त्यांनी याबाबत पावलं उचलायला सांगितली. त्यामुळे दोन्ही देशातील सूत्रं हलली आणि निर्मला यांना भारतात येण्यास परवानगी मिळाली. हे वाचा - भारीच! फक्त Ice Cream खा आणि मिळवा भरघोस पगार; टेस्ट टेस्टर म्हणजे म्हणजे काय? अटारी सीमेवरून झाला प्रवेश भारत पाकिस्तानदरम्यानच्या अटारी सीमेवरून निर्मला यांनी भारतात प्रवेश केला. तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या वधूनं शनिवारी आपल्या सासरी पहिलं पाऊल टाकलं. तीन वर्षांनंतर का असेना, पण पत्नी घरी आल्यामुळे सध्या विक्रम सिंह आणि त्यांचे कुटुंबी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.