मराठी बातम्या /बातम्या /देश /

गुजरातमध्ये आप दाखवणार का करामत? एग्झिट पोलमधून धक्कादायक निकाल

गुजरातमध्ये आप दाखवणार का करामत? एग्झिट पोलमधून धक्कादायक निकाल

गुजरातमध्ये आप दाखवणार का करामत?

गुजरातमध्ये आप दाखवणार का करामत?

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वास्तव वेगळेच असल्याचे समोर आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

अहमदाबाद, 5 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात यंदा वेगळाच रंग पाहायला मिळत आहे. कारण, यावेळी काँग्रेससोबत आपनेही मोठी ताकद लावली. भाजपनेही आपला गड राखण्यासाठी देशभरातील मंत्र्यांना गुजरातमध्ये पाचारण केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी ते अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले. आता वेगवेगळ्या एजन्सीने त्यांचे एग्झिट पोल जाहीर केले आहेत. यात आपची जादू चालणार का? हेही समोर आले आहे.

TV9 Bharat Varsh Gujarat Exit Polls: भाजपला 125-130 जागा मिळण्याची शक्यता

TV9 Bharatvarsh च्या एक्झिट पोलमध्ये गुजरात निवडणुकीत भाजपला 125-130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 40 ते 50 जागा आणि 'आप'ला केवळ 3-5 जागा मिळतील, तर इतरांना 3 ते 7 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Republic Gujarat Exit Polls: भाजपला 128 ते 148 जागा मिळणार

रिपब्लिक न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला 128 ते 148 जागा, काँग्रेसला 30-42 जागा, आप 2 ते 10 जागा, तर इतरांना 0 ते 3 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

ताजे एग्झिट पोल पाहण्यासाठी https://lokmat.news18.com/assembly-elections-2022/exit-poll-result/ क्लिक करा

NewsX Jan Ki Baat Gujarat Exit Polls: भाजपला पूर्ण बहुमत

न्यूज एक्स आणि जन की बातच्या एक्झिट पोलने भाजपला पूर्ण बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला 117 ते 140 जागा, काँग्रेसला 34-51 जागा, आप 6 ते 13 जागा, तर इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

Exit Polls Gujarat 2022: काँग्रेस विजयापासून दूर

काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर लढलेल्या निवडणुकांमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या आघाडीने, काँग्रेसचे बंडखोर नेते चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील जनसंघ आणि किसान मजदूर पक्षाचा पराभव केला. त्यानंतर 1980 आणि 1985 च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. 1990 च्या निवडणुकीत जनता दल आणि भाजप एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आले. 1995 नंतर झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.

वाचा - भारतात एक्झिट पोलसाठी लगीनघाई; पण, या देशांमध्ये आहेत कठोर कायदे

Exit Polls Gujarat 2022: गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 58 टक्के मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मतदान संपले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या टप्प्यात सुमारे 58.68 टक्के मतदान झाले.

आपचा दावा फोल..

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न करत होता. वास्तविक, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सर्व 29 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. आता गुजरातच्या लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचा आपचा दावा आहे. त्याचे राष्ट्रीय प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अलीकडच्या काळात अनेकवेळा राज्याचा दौरा केला होता. मात्र, समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांना खातं उघडण्यात यश मिळू शकतं. मात्र, चार ते पाच सीटपेक्षा जास्त जागा येणार नसल्याचे दिसत आहे.

Exit Polls Gujarat 2022: गेल्या 6 विधानसभा निवडणुकीत भाजपची बाजी

गुजरात चुनाव एक्झिट पोल निकालः गुजरातमधील गेल्या सहा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने सलग विजय मिळवला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. टक्केवारीचा विचार करता त्या निवडणुकीत भाजपला 49.05 टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला 42.97 टक्के मते मिळाली.

Gujarat Chunav Exit Polls Result 2022: गुजरातमध्ये सुमारे 5 कोटी मतदार

गुजरातमध्ये 4.9 कोटींहून अधिक मतदार आहेत आणि त्यापैकी 4.6 लाख असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. निवडणूक आयोगाने राज्यात 51,782 मतदान केंद्रे स्थापन केली होती. त्यापैकी 34,276 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आणि 17,506 मतदान केंद्रे शहरी भागात होती.

First published:

Tags: Exit polls, Exit polls 2022, Gujrat